उल्हास नदी बचाव कृती समिती उल्हास नदीतून जलपर्णी काढण्यासाठी सरसावली

डोंबिवलीसह ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या उल्हास नदीत मोठ्या प्रमाणावर घरगुती सांडपाणी सोडले जात असल्यामुळे या नदीत पावसाळा संपताच जलपर्णी वेगाने वाढू लागते. मात्र उल्हास नदी बचाव कृती समिती च्या कार्यकर्त्यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही नदीतून जलपर्णी काढण्यासाठी पुढाकार घेतला आहे. आज या कृती समितीचे सभासद असलेल्या आजूबाजूंच्या गावातील नागरिकानी सकाळपासून आपापल्या परीने बोटी काट्याद्वारे नदीची जलपर्णीच्या विळख्यातून सुटका करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

कल्याण (Kalyan).  डोंबिवलीसह ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या उल्हास नदीत मोठ्या प्रमाणावर घरगुती सांडपाणी सोडले जात असल्यामुळे या नदीत पावसाळा संपताच जलपर्णी वेगाने वाढू लागते. मात्र उल्हास नदी बचाव कृती समिती च्या कार्यकर्त्यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही नदीतून जलपर्णी काढण्यासाठी पुढाकार घेतला आहे. आज या कृती समितीचे सभासद असलेल्या आजूबाजूंच्या गावातील नागरिकानी सकाळपासून आपापल्या परीने बोटी काट्याद्वारे नदीची जलपर्णीच्या विळख्यातून सुटका करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

यंदाही नोव्हेंबर अखेरीपासून उल्हास नदी पात्रात जलपर्णी वेगाने वाढू लागली आहे. मात्र या नदीतून पाण्याची उचल करणाऱ्या आणि पाण्याचे नियोजन करणाऱ्या सर्वच प्राधिकरणाला नदीपात्र स्वच्छतेचा विसर पडला आहे. दरवर्षी हे कार्यकर्ते नदीतून जलपर्णी काढण्याचा वारंवार प्रयत्न करतात मात्र जलपर्णी हद्दपार होत नसल्याचे शासनाने ठोस कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. या जलपर्णीमुळे नदीच्या पाण्यात असण्याने जलचरांना जीव गमवावा लागतो तर नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागते. यामुळे शासनाने जलपर्णी उगमस्थाने बंद करावीत आणि नदी स्वच्छतेसाठी कठोर उपाय शासनाने अवलंबवेत अशी मागणी त्यांनी केली आहे.