उल्हास नदीची जलपर्णीच्या विळख्यातून सुटका

कल्याण : दरवर्षी डिसेंबर ते जुन पाऊस पडेपर्यंत मोहेली उदचंन केंद्र ते मोहने उल्हास नदी बंधारा परिसरात नदीपात्रात जलपर्णीचा विळखा पडल्याचे चित्र दिसत असे. कल्याण डोंबिवली महापालिकेला पाणीपुरवठा

कल्याण : दरवर्षी डिसेंबर ते जुन पाऊस पडेपर्यंत मोहेली उदचंन केंद्र ते मोहने उल्हास नदी बंधारा परिसरात नदीपात्रात जलपर्णीचा विळखा पडल्याचे चित्र दिसत असे. कल्याण डोंबिवली महापालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या उल्हास नदीपात्रात जलपर्णी मोठ्या प्रमाणात झाल्याने नदी पात्राचा श्वास कोंडला असल्याचे चित्र दिसत असे. पाण्यात असणाऱ्या जलपर्णीमुळे पाण्यात शेवाळ निर्माण होत असून ही वनस्पती मोठ्या प्रमाणात पाणी शोषत असल्यामुळे उन्हाळ्यात नदी पात्रातील पाण्याची पातळी कमी होत असल्याचे मत अनेक तज्ञांनी जलपर्णी प्रश्नाच्या निमित्ताने मांडले होते. उल्हास नदी जलपर्णी प्रश्नावरून राजकीय पक्षांच्या मंडळीचा कलगी तुरा रगंत असे. तर क.डो.म.पा.प्रशासन उल्हासनदी पात्रात येणारी जलपर्णी काढण्यासाठी लाखो रुपये खर्च करत असते. असे असुन समस्या जुन माहिन्यापर्यंत पाऊस पडे पर्यंत कायम असे. जलपर्णीचा प्रार्दुभाव टाळण्यासाठी खेमणी नाला जो सेन्चुरी क्लब हाऊस परिसरालगत उल्हास नदीत येऊन मिळत आहे. त्या परिसरात उल्हासनगर मनपाने पपिंंग स्टेशन उभारले असले तरी म्हारळ येथील दुषित नाल्याचे पाणी थेट नदी पात्रात येत आहे. तर मोहने येथील फुलेनगर परिसरातुन येणारे सांडपाणी मिश्रित दुषित पाणी थेट नदीपात्रात येत आहे. ही दरवेळची स्थिती असतानादेखील सद्यस्थितीत उल्हास नदीचे पाणी मोहेली ते मोहने बंधाऱ्यापर्यंत स्वच्छ व नितळ कसे झाले. हा नैसर्गिक बदल घडला कसा? असा प्रश्न पडला आहे.

 कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव टाळण्यासाठी २२ मार्चपासुन लॉकडाऊन सुरु आहे. नदीपात्रात येणारे कारखान्याचे दुषित पाणी कारखाने बंद असल्याने येत नाही. दुषित पाण्यामुळे या परिसरात होणारे जल प्रदुषण कमी झाल्याने हा परिणाम झाल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. या संदर्भात पर्यावरण तज्ञ गुणवंत पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, हवेतील प्रदूषण कमी झाले असून, कारखाने बंद असल्याने कारखान्यातुन होणारे प्रदूषण  कमी झाले आहे. माणसांचा नदी क्षेत्रातील वावर कमी झाला आहे. नदीला स्वयं शुध्दीकरण क्षमता असते. तसेच नदीपात्रातील जलचर सजीव सृष्टी कार्यान्वित झाल्याने नदीपात्रातील पाणी स्वच्छ व नितळ होत आहे.