ulhas river overflow

बदलापुरात रविवारपासून जोरदार पाऊस(Heavy Rain In Bandlapur) सुरू आहे. त्यामुळे रविवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास उल्हास नदीच्या(Ulhas River Water Level Rise) पाण्याची पातळी १३.७० मीटरपर्यंत पोहोचली होती.

    बदलापूर: रविवारपासून पावसाने दमदार हजेरी(Rain In Badlapur) लावल्यामुळे बदलापूरातून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या(Ulhas River Water Level Rise) पात्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सोमवारी दुपारपर्यंत उल्हास नदीच्या पाण्याच्या पातळीने १४.३० मी चा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे उल्हास नदी दुथडी भरून वाहू लागली आहे.

    बदलापुरात रविवारपासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे रविवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास उल्हास नदीच्या पाण्याची पातळी १३.७० मीटरपर्यंत पोहोचली होती. रविवारी रात्री जोरदार पाऊस झाला. तसेच सोमवारी सकाळपासूनही पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे सोमवारी दुपारपर्यंत नदीच्या पाण्याची पातळी १४.३० मीटरपर्यंत पोहोचली असून उल्हास नदीवर नगर परिषदेच्या माध्यमातून उभारण्यात आलेली चौपाटी पाण्याखाली गेली आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास नदीपात्रालगतच्या सखल भागात पाणी शिरून ते जलमय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

    ulhas river

    बदलापुरात उल्हास नदीच्या पाण्याची धोक्याची पातळी साडेसतरा मीटर आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी दीपक पुजारी यांनी सोमवारी उल्हासनदी पात्र परिसरात पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. अग्निशमन दलाचे फायर ऑफिसर भागवत सोनोने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून अग्निशमन दल सज्ज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, जोरदार पावसाने बदलापूर रेल्वे स्थानकात रुळावरही पाणी साचले होते.