Knife-attack

उल्हासनगर भाजपाचे उपजिल्हाध्यक्ष जयकुमार शर्मा यांच्यावर उल्हासनगरमध्येच जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली. या जीवघेण्या हल्ल्यामध्ये शर्मा यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना उल्हासनगरच्या खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.

    उल्हासनगर : उल्हासनगर भाजपाचे उपजिल्हाध्यक्ष जयकुमार शर्मा यांच्यावर उल्हासनगरमध्येच जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली. या जीवघेण्या हल्ल्यामध्ये शर्मा यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना उल्हासनगरच्या खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.

    उल्हासनगर कॅम्प नंबर 3 भागातील इंदिरा गांधी मार्केट परिसरात जयकुमार शर्मा यांच्या मालकीचे घर आहे. यात सध्या ते राहत नसून ते घर त्यांनी भाड्याने दिले आहे. गेल्या काही महिन्यांपासून या घरात भाडेकरू राहतात. मात्र या भाडेकरूंना रात्रीच्या सुमारास काही अज्ञात लोक त्रास देतात. हे भाडेकरू रात्रीच्या वेळेस झोपल्यावर त्यांचा दरवाजा वाजवून त्यांना त्रास देण्याचा प्रकार काही अज्ञातांकडून सुरू होता. गेल्या काही दिवसांपासून होत असलेला हा त्रास चांगलाच वाढल्यानंतर अखेर भाडेकरूंनी घर मालक जयकुमार शर्मा यांना ही बाब सांगितली.

    मात्र, कामाच्या व्यापातून वेळ मिळत नसल्याने त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. शनिवारी रात्री पुन्हा रात्री 1 वाजण्याच्या सुमारास भाडेकरूंनी शर्मा यांच्याकडे कोणीतरी दार वाजवत असल्याची तीच तक्रार केल्यानंतर शर्मा तिथे गेले असता अज्ञातांनी त्यांच्यावर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला केला.