उल्हासनगरमध्ये २ कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी डॉक्टरांची समिती तयार

उल्हासनगर : उल्हासनगरच्या कोव्हिड- १९ रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांवर उत्तम उपचार होऊन ते लवकरात लवकर बरे व्हावेत, यासाठी शहरातील तब्बल १५ डॉक्टरांची टीम गठीत करण्यात आली आहे. ही टीम

 उल्हासनगर : उल्हासनगरच्या कोव्हिड- १९ रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांवर उत्तम उपचार होऊन ते लवकरात लवकर बरे व्हावेत, यासाठी शहरातील तब्बल १५ डॉक्टरांची टीम गठीत करण्यात आली आहे. ही टीम तासातासाला रुग्णांच्या प्रकृतीची माहिती घेऊन त्या परीने उपचारात बद्दल करणार आहेत.  उल्हासनगर महापालिका क्षेत्रात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव नसला तरी पालिकेची तयारी चांगली आहे. १०० खाटांची मर्यादा असलेल्या शासकीय प्रसूती रुग्णालयाचे रूपांतर कोव्हीड १९ रुग्णालयात केले आहे. सध्या या रुग्णालयात २ रुग्ण उपचार घेत आहेत. या रुग्णांच्या योग्य उपचारासाठी पालिके आयुक्त सुधाकर देशमुख यांनी शहरातील खाजगी डॉक्टरांची टीम तयार केली आहे. या टीममध्ये डॉ. राजू उत्तमानी, डॉ. हार्दिक शहा, डॉ, अशोक जोशी, डॉ. सुषमा तोमार, डॉ. रिटा रोचलानी, डॉ. भारत जग्यासी, डॉ. नंदा सावंत, डॉ. नितीन जोशी, डॉ. राहुल चौधरी, डॉ. राजेश कुकरेजा, डॉ. वर्षा दावानी, डॉ. हरेश शाहादादपुरी, डॉ. प्रकाश कौरानी यांचा समावेश आहे. याबाबत पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी सांगितले की, रुग्णांवर योग्य ते उपचार देण्यासाठी अनुभवी डॉक्टरांचू नेमणूक केली आहे. हे डॉक्टर रुग्णाच्या प्रकृतीवर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून लक्ष ठेवतील. तसेच त्यांच्या गरज पडल्यास रुग्णांना प्रत्यक्ष भेट देऊन उपचार देतील. यामुळे रुग्ण लवकर बरे होण्यास मदत होईल, असे सुधाकर देशमुख यांनी सांगितले.