रस्त्यात वयोवृध्द महिलेला लुबाडले

उल्हासनगर :उल्हासनगर कॅम्प ५ येथील कैलाश कॉलनी परिसरात इंदरा दुसेजा ही वयोवृध्द महिला राहते. सकाळी साडे ९ च्या सुमारास त्या दुधनाक्याकडून कॅम्प ५ कैलाश कॉलनीकडे रस्त्याने पायी जात

 उल्हासनगर :  उल्हासनगर कॅम्प ५ येथील कैलाश कॉलनी परिसरात इंदरा दुसेजा ही वयोवृध्द महिला राहते. सकाळी साडे ९ च्या सुमारास त्या दुधनाक्याकडून कॅम्प ५ कैलाश कॉलनीकडे रस्त्याने पायी जात होत्या. त्यावेळी दोन भामटयांनी त्यांना रस्त्यात अडवले. पुढे चेकिंग चालू आहे. तुम्ही तुमच्या जवळील सोन्याचे दागिने काढुन बॅगमध्ये ठेवून दया असे बोेलत त्या दोघांनी इंदरा यांना त्यांच्या हातातील साडे ३ तोळयाच्या सोेन्याच्या बांगडया काढण्यास सांगितले. इंदरा यांनी त्या बांगडया काढून पिशवीत ठेवत असताना त्या दोघांनी त्यांना बोलण्यात गुंतावूण त्यांचे लक्ष विचलीत करून त्यांच्याजवळील सोन्याच्या बांगडया पिशवीत ठेवत असल्याचे भासवत असून त्या लंपास केल्या. या प्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात त्या दोन भामट्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार गायकवाड करीत आहेत.