भर रस्त्यात गुंडाची तलवारबाजी, गुंडाला पकडताना पोलीस जखमी

उल्हासनगर :कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी असताना काल एक गुंड भर रस्त्यात तलवारबाजी करून दहशत माजविण्याचा प्रयत्न करीत होता. या गुंडाला ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलिसाला तलवार लागून तो

उल्हासनगर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी असताना काल एक गुंड भर रस्त्यात तलवारबाजी करून दहशत माजविण्याचा प्रयत्न करीत होता. या गुंडाला ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलिसाला तलवार लागून तो जखमी झाला आहे. उल्हासनगर कॅम्प ४ येथील मराठा सेक्शन विभागातील शिवाजी चौकात काल सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे गोपनीय विभागाचे पोलीस तुषार घोरपडे आणि आव्हाड हे हद्दीत गस्त घालत असताना आरोपी दिनेश सुरेला हा खुलेआम धारदार तलवार घेऊन फिरत होता. त्याला पोलिसांनी हटकले असता आरोपीने प्रतिकार केला आणि यात पोलीस शिपाई घोरपडे याच्या हाताला दुखापत झाली आहे. तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी दिनेशला ताब्यात घेऊन तलवार जप्त केली आहे. आरोपी दिनेशवर या पुर्वीही मारहाण, हत्यार, पिस्तुल बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली असून न्यायालयात हजर केले असता २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.