त्या अडाणी चोरट्यांनी रुग्णालयाची खिडकी तोडली आणि चोरून नेले ‘या’ लसींचे २५ डोस; वाचून तुम्हालाही हसू आवरणार नाही

लसींचा तुटवडा झाल्यामुळे १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांचं लसीकरण थांबवण्यात आलं आहे. दरम्यान, लसीकरण थांबवल्यामुळे काही अडाणी चोरट्यांनी अंबरनाथमधील मांगरूळ आरोग्य केंद्रातून कोरोना लसीचा डोस चोरण्याची योजना आखली. ठरल्याप्रमाणे मलंगगड परिसरातल्या मांगरूळ आरोग्य केंद्राची खिडकी तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला.

    ठाणे : महाराष्ट्रात कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असतानाच लसीकरण मोहीमही मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आली होती. देशात महाराष्ट्र राज्याने सर्वाधिक लसीकरण पूर्ण केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात लसींचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

    लसींचा तुटवडा झाल्यामुळे १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांचं लसीकरण थांबवण्यात आलं आहे. दरम्यान, लसीकरण थांबवल्यामुळे काही अडाणी चोरट्यांनी अंबरनाथमधील मांगरूळ आरोग्य केंद्रातून कोरोना लसीचा डोस चोरण्याची योजना आखली. ठरल्याप्रमाणे मलंगगड परिसरातल्या मांगरूळ आरोग्य केंद्राची खिडकी तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला.

    आरोग्य केंद्राची खिडकी तोडून आत प्रवेश केल्यानंतर कोरोनाची लस समजून चोरट्यांनी पोलिओच्या तब्बल २५ लसी चोरुन नेल्याचा प्रकार घडला आहे. हा सर्व प्रकार आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ उल्हासनगरच्या हिललाईन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

    कोरोनाची लस समजून चोरट्यांनी २५ पोलिओच्या लसी चोरून नेल्याने परिसरात नागरिकांमध्ये एकच हशा पिकला. चोरट्यांनी कोरोना लस चोरण्यासाठी प्रयत्न केले पण त्यांच्या हाती पोलिओचे डोस लागले ही गोष्ट परिसरातील नागरिकांना कळल्यानंतर अनेक चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळालं. या प्रकरणात उल्हासनगरच्या हिल लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

    uneducated thieves break hospital window and take away polio vaccine instead of corovirus vials in ambernath