Unidentified thieves challenged Thane police, did Reiki and broke into the house

कोपरी पारशीवाडी परिसरात दाटीवाटीच्या चाळी असून या ठिकाणी लोकांची वर्दळ कायमची असते, चोरट्याने फिर्यादी वसंत भवरलाल चव्हाण यांच्या घराची रेकी करून हातसफाई केल्याच्या घटनेने पारशीवाडीतील लोकांमध्ये घाबराहटीचे वातावरण आहे.

ठाणे : ठाण्यात रोज अज्ञात आरोपींच्या नावावर गुन्हे दाखल होताहेत. घरफोडी,सोनसाखळी,जबरी चोरी (thieves ) गुन्ह्यांची मालिकाच ठाण्यात घडत आहे. त्यामुळे अज्ञात चोरट्यांचे ठाणे पोलिसांना आव्हान (thieves challenged Thane police)  दिलेले आहे. अशीच घटना ठाण्याच्या कोपरी परिसरातील भरवस्तीत पारशीवाडीत चोरट्याने शनिवारी रात्री वसंत भवरलाल चव्हाण याच्या घरावर हातसफाई करून घरातील सोन्याचे, दांडीचे दागिने आणि रोकड असा तब्बल ३ लाखाचा मुद्देमाल लांबविला. पोलिसांनी श्वान पथकाच्या माध्यमातून तपास करीत पंचनामा करून अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा कोपरी पोलीस ठाण्यात नोंदविला आहे. पोलीस अज्ञात चोरट्याचा शोध घेत आहे.

कोपरी पारशीवाडी परिसरात दाटीवाटीच्या चाळी असून या ठिकाणी लोकांची वर्दळ कायमची असते, चोरट्याने फिर्यादी वसंत भवरलाल चव्हाण यांच्या घराची रेकी करून हातसफाई केल्याच्या घटनेने पारशीवाडीतील लोकांमध्ये घाबराहटीचे वातावरण आहे. फिर्यादी चव्हाण हे ४० वर्षांपासून या परिसरात राहतात. पती-पत्नी आणि दोनमुळे असा परिवार आहे. शनिवारी रात्री कुटुंबाचे जेवण झाल्यानंतर ते सर्वजण झोपण्यासाठी भाड्याने घेतलेल्या रूम मध्ये झोपण्यास गेले.

रुम रिकामा असलायची संधी साधत रेकी केलेल्या चोरट्याने घरात प्रवेश करून घरातील ५० हजाराची चांदीची बालाजीची मूर्ती, ९० हजाराचे सोन्याची दोन ब्रेसलेट, सोनायच्या दोन चैनी, सोन्याचे चार कॉईन, सोन्याची तीन बिस्किटे, १ किलो वजनाचे लक्ष्मीचे ५० चांदीचे कॉईन आणि २० हजार रुपये रोख असा मुद्देमाल घेऊन पोबारा केला. रविवारी सकाळी घरी आल्यानंतर चोरी झाल्याचे समोर आले. वसंत चव्हाण यांनी तात्काळ कोपरी पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार नोंदविली. पोलिसांनी श्वानाच्या सहाय्याने चोरट्यांचा मागोवा काढण्याचा प्रयत्न केला. कोपरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून कोपरी पोलीस अज्ञात चोरट्याचा शोध घेत आहेत.