वडूनवघरच्या उपसरपंचपदी दामिनी चौघुले यांची बिनविरोध निवड

भाजपचे विद्यमान उपसरपंच केसरीनाथ पाटील यांनी आपसात ठरल्याप्रमाणे राजीनामा दिला होता.त्यामुळे उपसरपंचपदासाठी विद्यमान सरपंच सोनम यतीश चौघुले यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.या निवडणुकीसाठी सरपंच सोनम चौघुले,सदस्य केसरीनाथ पाटील, पूनम पाटील ,संजना पाटील, शिवसेनेचे कुलदीप पाटील, सचिन पाटील आदी सदस्य उपस्थित होते.

भिवंडी :  भिवंडी (Bhiwandi) तालुक्यातील वडूनवघर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपच्या दामिनी दुष्यंत चौघुले (Damini Chowghule) यांची गुरुवारी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.भाजपचे विद्यमान उपसरपंच केसरीनाथ पाटील यांनी आपसात ठरल्याप्रमाणे राजीनामा दिला होता.त्यामुळे उपसरपंचपदासाठी विद्यमान सरपंच सोनम यतीश चौघुले यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.या निवडणुकीसाठी सरपंच सोनम चौघुले,सदस्य केसरीनाथ पाटील, पूनम पाटील ,संजना पाटील, शिवसेनेचे कुलदीप पाटील, सचिन पाटील आदी सदस्य उपस्थित होते.तर जयदास पाटील, हर्षदा पाटील, सरीता चौघुले या तीन शिवसेना सदस्यांनी निवडणुकीपासून अलिप्त राहणे पसंत केले.

वडूनवघर ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपा व शिवसेनेत मोठी रस्सीखेच झाल्याने सार्वत्रिक निवडणूक अटीतटीची झाली होती.या निवडणुकीत भाजप ग्रामीणचे जिल्हा उपाध्यक्ष यतीश चौघुले यांनी व्यूहात्मक निवडणूक लढवून ग्रामपंचायतीवर भाजपची सत्ता प्रस्थापित केली आहे.या निवडणुकीत उपसरपंचपदी दामिनी चौघुले यांची बिनविरोध निवड होताच टेंभवली गावच्या तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष कपिल भोईर,भाजप जिल्हा उपाध्यक्ष यतीश चौघुले, मुकुंद पाटील,दुष्यंत चौघुले,रंजित जोशी आदींनी नवनिर्वाचित उपसरपंच दामिनी चौघुले यांना पुष्पमाला अर्पण करून त्यांचे अभिनंदन केले.

दरम्यान महिनाभरापूर्वी वडूनवघर गावचे सुपूत्र तथा शिक्षण महर्षी महादेव चौघुले व माजी सरपंच पंडित चौघुले यांचे दुःखद निधन झाले आहे.त्यांच्या प्रेरणेने  ग्रामपंचायतीवर सरपंच आणि उपसरपंच पदावर चौघुले कुटुंबातील सदस्य विराजमान झाले असून भविष्यात स्व.चौघुले बंधूंच्या पावलावर पाऊल ठेवून जनहिताची विकासकामे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मार्गी लावू असा विश्वास यतीश चौघुले यांनी व्यक्त केला आहे.