urmila matondkar in thane

ठाण्यात(Thane) विहंग चॅरिटेबल ट्रस्टच्या(Vihang Charitable Trust) वतीने आयोजित मंगळागौर कार्यक्रमात(Urmila Matondkar In Manglagour Program) उर्मिला मातोंडकर उपस्थित होती. यावेळी तिने आदिवासी महिलांसोबत आदिवासी लोकनृत्यावर(Dance) ठेका धरला.

    ठाणे : कोरोना(Corona) काळात मराठी कलाकार,लोक कलावंत,नाट्यकर्मी यांचं मोठं नुकसान झाले. अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे, तसेच अद्याप नाट्यगृह(Drama Theatre Closed) बंदच आहेत ही एक शोकांतिकाच असल्याची प्रतिक्रिया अभिनेत्री आणि शिवसेना महिला उपनेत्या उर्मिला मातोंडकरने (Urmila Matondkar) व्यक्त केली. पण लवकरच ते देखील सुरु करण्याचा निर्णय येणार असल्याचे उर्मिला मातोंडकर यांनी सांगितले. दरम्यान प्रलंबित आमदारांच्या नियुक्तीबाबत विचारताच उर्मिला मातोंडकरने विधान परिषदेच्या आमदारकीची अपेक्षा असल्याचेही स्पष्ट केले.

    ठाण्यात(Thane) विहंग चॅरिटेबल ट्रस्टच्या(Vihang Charitable Trust) वतीने आयोजित मंगळागौर कार्यक्रमात(Urmila Matondkar In Manglagour Program) उर्मिला मातोंडकर उपस्थित होती. यावेळी तिने आदिवासी महिलांसोबत आदिवासी लोकनृत्यावर ठेका धरला. एवढेच नाही तर तिने लावणीच्या दोन ओळी गाऊन उपस्थितांची मन जिंकली. संस्कृती,लोककला,पारंपरिक कला टिकून राहावी यासाठी राज्य शासन नवीन योजना आणण्याच्या प्रयत्नात आहे आणि मी त्या समितीवर आहे म्हणुन लवकरच प्रयत्न केले जाणार असल्याचे तिने सांगितले.