Municipal Corporation to implement CM City Road Scheme in Thane It will help in developing undeveloped roads

सुरवातीच्या काळात ठाण्यात कोरोनाचा पहिला रुग्ण घोडबंदर येथे आढळून आला. त्यावेळी देखील डॉ. वृषाली गौरवार यांनी पुढे येऊन त्या रुग्णावर उपचार सुरू केले. त्यानंतर या रुग्णावर उत्तम उपचार करून कर्तव्य पार पाडले. दरम्यान, ठाणे महापालिकेच्या वतीने लस घेण्यासाठी देखील डॉ.वृषाली गौरवार यांनी पुढाकार घेऊन ठाण्यातील पहिल्या लसीचा मान पटकावणार आहेत.

ठाणे : ठाण्यात आजपासून कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात झाली असून पहिल्या लसीचा मान डॉ.वृषाली गौरवार यांना मिळाला आहे. कोरोना काळात त्यांनी प्रचंड मेहनत घेऊन रूगांची सेवा केली. त्याचबरोबर कोरोनासारख्या विषाणूचा सामना करत दोन हात केले. त्यामुळे एकप्रकारे कोरोना योद्धा म्हणून देखील त्याच्याकडे पाहिले जात आहे.

सुरवातीच्या काळात ठाण्यात कोरोनाचा पहिला रुग्ण घोडबंदर येथे आढळून आला. त्यावेळी देखील डॉ. वृषाली गौरवार यांनी पुढे येऊन त्या रुग्णावर उपचार सुरू केले. त्यानंतर या रुग्णावर उत्तम उपचार करून कर्तव्य पार पाडले. दरम्यान, ठाणे महापालिकेच्या वतीने लस घेण्यासाठी देखील डॉ.वृषाली गौरवार यांनी पुढाकार घेऊन ठाण्यातील पहिल्या लसीचा मान पटकावणार आहेत.

ठाणे शहरात आजपासून कोरोना लसीकरण मोहिमेला सुरूवात झाली असून महापालिकेची संपूर्ण यंत्रणा यासाठी सज्ज झाली आहे. एकूण चार केंद्रांवर ही लसीकरण मोहिम सुरू करण्यात आली असून नागरिकांनी महापालिकेकडून लसीकरणासाठीचा संदेश आल्याशिवाय अनावश्यक गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. चार केंद्रावर लस देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून ठाणे शहरामध्ये रोझा गार्डनिया या ठिकाणी पहिली लस टोचण्यात येणार आहे.

शासनाच्या आदेशानुसार अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी असणाऱ्या डॉक्टर,आरोग्य कर्मचारी, मेडिकल स्टाफ, सफाई कामगार,पोलिसांना लस देण्यात येत आहे.