अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील लसीकरण बंद राहणार

    मुंबई : अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची गैरसोय होवू नये यासाठी ठाणे शहरातील सर्व केंद्रावरील लसीकरण आज दिनांक २० जुलै २०२१ पासून पुढील निर्देश येईपर्यंत बंद राहणार असून नागरिकांनी याची नोंद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

    मुंबई, ठाण्यासह कोकण परिसरात हवामान खात्याने अतिवृष्टीचा ईशारा दिला आहे. त्यापार्श्वभूमीवर नागरिकांनी लसीकरणासाठी घराबाहेर पडल्यावर त्यांची गैरसोय होवू नये यासाठी सर्व केंद्रावरील लसीकरण बंद ठेवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.

    लसीकरणाबाबत पुढील निर्देश येईपर्यंत सर्व केंद्रावरील लसीकरण बंद राहणार असून नागरिकांनी यांची नोंद घेण्याचे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.