traffic

संध्याकाळी सातच्या सुमारा पासुन साडेनऊ वाजण्याच्या सुमारा पर्यंत वडवली रेल्वे फाटकांच्या दुर्तफा वाहानांच्या लांबच लांब रांगा लागल्याने मोहने कल्याण रस्यावर वाहानांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुमारे दोन तासाहुन अधीक काळ वाहतुक कोंडीचा फटका बसल्याने नियोजित ठिकाणी पोहचण्यास उशीराला सामोरे जावे लागले. घरी परतणाऱ्या वाहतुक कोडींचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला तर दरम्यान सुमारे रेल्वेच्या पाच ते सहा रेल्वे गाड्या पास होत झाल्याने रेल्वे फाटक बंद असल्याने रेल्वे फाटक दरम्यान रस्त्यावर रस्त्याच्या दुर्तफा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. वाहतूक कोंडी मुळे वाहनाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.

टिटवाळा : कोरोना पार्श्वभूमीवर चाकरमानी तसेच अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, व्यापारी, तसेच कामधंद्या निमित्ताने चारचाकी, दुचाकी, रिक्क्षा, बसेस् या वाहानांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मध्य रेल्वेच्या अंबिवली व शहाड रेल्वे स्थानका दरम्यान असलेले वडवली रेल्वे क्राँसिंग गेट नं४७ फाटकामुळे होणाऱ्या वाहतुक कोंडी मुळे रेल्वे फाटकांच्या दुर्तफा वाहनांच्या रांगा शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास लागल्याने दीड तास वाहनांची वाहतुक कोंडी झाल्याने वडवली रेल्वे फाटक खोळंबा फाटक झाल्याचे चित्र नेहमीच दिसते.

शुक्रवारी संध्याकाळी सातच्या सुमारा पासुन साडेनऊ वाजण्याच्या सुमारा पर्यंत वडवली रेल्वे फाटकांच्या दुर्तफा वाहानांच्या लांबच लांब रांगा लागल्याने मोहने कल्याण रस्यावर वाहानांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुमारे दोन तासाहुन अधीक काळ वाहतुक कोंडीचा फटका बसल्याने नियोजित ठिकाणी पोहचण्यास उशीराला सामोरे जावे लागले. घरी परतणाऱ्या वाहतुक कोडींचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला तर दरम्यान सुमारे रेल्वेच्या पाच ते सहा रेल्वे गाड्या पास होत झाल्याने रेल्वे फाटक बंद असल्याने रेल्वे फाटक दरम्यान रस्त्यावर रस्त्याच्या दुर्तफा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. वाहतूक कोंडी मुळे वाहनाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.

वडवली रेल्वे उड्डाणपूलाचे काम गेली १२वर्षी पासून रखडलेले आहे. रेल्वे प्रशासनाने त्यांच्या अख्यारितेतील रेल्वे पुलाचे काम पुर्ण केले असले तरी क.डो.म.पा.चे वडवली उड्डाणपूलाचे काम कासव गतीने सुरु आहे. रेल्वे प्रशासनाने क.डो.म.पा.प्रशासनास वडवली रेल्वे ४७ रेल्वे क्राँसिंग गेट कधीही बंद करु असे पत्र दिल्याची सुत्राची माहिती असली तरी देखील वडवली उड्डाणपूलाचे काम मनपा प्रशासन कधी मार्गी लावणार अशी मागणी सर्व सामान्य नागरिक वडवली रेल्वे क्राँसिंग गेट मध्ये होणारी वाहतूक कोंडी ,तसेच रेल्वे फाटकामुळे खोळंब्यामुळे विलंबामुळे करीत आहेत.

वडवली रेल्वे क्राँसिंग फाटक हे खोळंबा फाटक बनले आहे. वाहनचालकांनी बेशिस्त पणे वाहने चालवु नयेत. लेनची शिस्त पाळवी जेणेकरून वाहतुक कोंडी होणार नाही. तसेच वाहतुक शाखा यांचा समन्वय नसल्याने वडवली रेल्वे फाटकांच्या दुर्तफा वाहतुक कोंडी ही नेहमीच दिसते. त्यामुळे रेल्वे वाहतूक सेवेला देखील उशीराने सामारे जावे लागते. आता तरी प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे. वडवली उड्डाण पुलाचे काम मार्गी लावले पाहिजे. अशी प्रतिक्रिया शिवसेना कल्याण ग्रामीण ग्राहक संरक्षक कक्ष तालुका प्रमुख कल्याण विजय देशेकर यांनी यानिमित्ताने दिली.”