Valli Rajan met supriya sule

कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या ३४ हजार पार गेली असून सुमारे ५ हजार रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत ७१५ रुग्णांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासन राज्य सरकारच्या सहकार्याने रुग्णांवर उपचार करत आहेत. असे असले तरी कल्याण डोंबिवलीतील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे.

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका (KDMC) क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव ( Corona situation) वाढतच असून दिवसागणिक रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. याबाबत राष्ट्रवादीचे कल्याण डोंबिवली जिल्हा उपाध्यक्ष आणि कवच सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष वल्ली राजन (Valli Rajan) आणि माजी नगरसेवक प्रकाश तरे यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांची यशवंतराव चव्हाण सेंटर याठिकाणी तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांची राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात भेट घेऊन चर्चा केली.

कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या ३४ हजार पार गेली असून सुमारे ५ हजार रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत ७१५ रुग्णांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासन राज्य सरकारच्या सहकार्याने रुग्णांवर उपचार करत आहेत. असे असले तरी कल्याण डोंबिवलीतील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. तसेच लॉकडाऊन काळात महावितरणकडून भरमसाठ वीज बिलं पाठवली आहेत. लॉकडाऊनमुळे बहुतांश नागरिकांचा रोजगार बंद असल्याने हि भरमसाठ वीजबिलं भरायची कशी हा प्रश्न नागरिकांसमोर आहे. त्यामुळे यावर देखील तोडगा काढणे गरजेचे असल्याचे वल्ली राजन यांनी सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांना सांगितले.

दरम्यान कल्याण डोंबिवलीतील वाढती कोरोना रुग्णसंख्या आणि वाढीव वीजबिल याबाबत ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासन सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी दिले असल्याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष वल्ली राजन यांनी दिली.