रानभाज्यांची विक्री करून आदिवासी देतायत कुटुंबाला आधार

कल्याण : लॉकडाऊनमुळे कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागातील आदिवासी बांधवांच्या आर्थिक घडीला हातभार लावणारा रानमेवा रानातच राहिला. आता मिशन बिगीन अगेन अंतर्गत लॉकडाऊन शिथील झाल्याने पावसाळ्यात येणाऱ्या

कल्याण : लॉकडाऊनमुळे कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागातील आदिवासी बांधवांच्या आर्थिक घडीला हातभार लावणारा रानमेवा रानातच राहिला. आता मिशन बिगीन अगेन अंतर्गत लॉकडाऊन शिथील झाल्याने पावसाळ्यात येणाऱ्या रानभाज्यांची विक्री आदिवासी बांधवांच्या कुटुंबाचा आधार बनत आहे.                            कोरोनामुळे सकंटामुळे संपूर्ण देशाची आर्थिक घडी विस्कटली आहे . मात्र आता हळूहळू परिस्थिती सुधारत आहे. पावसाळा सुरु झाल्याने रानभाज्या आणि रानमेवा यांची विक्री करून आलेले पैसे मोल मजूरी करणाऱ्या अनेक आदिवासी कुटुंबाला अडचणीच्या काळात आधार ठरत आहेत.

 लॉकडाऊनमध्ये करवंद, जाभंळे, रान आंबे उपलब्ध असून विक्री करता आली नाही. मात्र आता पावसाळ्यातील क्नटोली, वळं, कुर्डु, घोळ, तेरा, टेंभरे, मोह फुले व फळे, तेलपट, कोळू, लोत, भोकर, मोखा, भारंगी, काटे-माठ, कुसरा, कुळू अशा रानभाज्या रानातुन  गोळा करीत टोपल्यातुन स्टेशन परिसर, हायवे लगत आणत आदिवासी त्याची विक्री करत आहेत. विक्रीतून कुटुंबाला आधार देत आहे. औषधी गुणधर्म असणाऱ्या पावसाळी रानभाज्यांना शहरी ग्राहक वर्गही चांगला प्रतिसाद देत आहे.