बजरंग दल कार्यकर्त्यांच्या सर्तकतेमुळे दिड टन गोमांस जप्त

भाजीपाल्याच्या टेम्पोतच मालेगाववरून डोंबिवलीच्या वेशीवर आलेल्या एका टेम्पोमधून बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या सर्तकतेमुळे दिड टन गोमांस टेम्पोसह मानपाडा पोलसांनी जप्त करून चालकाला ताब्यात घेतले आहे.

  • भाजीपाल्याच्या आढून गोमांसाची वाहतूक

कल्याण (Kalyan). भाजीपाल्याच्या टेम्पोतच मालेगाववरून डोंबिवलीच्या वेशीवर आलेल्या एका टेम्पोमधून बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या सर्तकतेमुळे दिड टन गोमांस टेम्पोसह मानपाडा पोलसांनी जप्त करून चालकाला ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे मार्च २०१५ पासून गोमांस विक्रीसाठी बंदी असूनही आजही भिवंडी, कल्याण, मुंब्रा, ठाणे व मुंबई या भागात हे गोमांस विक्रीसाठी ट्रक, टेम्पोमधून इतर जिल्ह्यासह पर राज्यातून विक्रीसाठी पाठविले जात असल्याचे अनेकदा बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी उघडकीस आणले आहे.

डोंबिवलीतील काटई नाक्यावर आज सकाळच्या सुमारास बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना एका भाजीपाला टेंपो क्रंमाक MH.03.CV.8853 यामध्ये गोमांस वाहतूक होत असल्याचा संशय आला. त्यामुळे बजरंगदल कार्यकर्तात्यांनी वरून भाजीपाला असलेल्या टेपोची आतमध्ये पहाणी केली असता, जनावराचे मांस असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी त्वरीत मानपाडा पोलिसांच्या ताब्यात हा टेम्पो व चालकास ताब्यात दिले. त्यांनतर पोलिसांनी बेकायदा जनावरांचे मांस वाहतूक केल्याप्रकरणी चालकावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. खळबळजनक बाब म्हणजे मालेगावातून जनावरांची कत्तल करून या टेम्पोमधून जनावरांच्या मांसाची वाहतूक होत असल्याची माहिती समोर आली आहे.