तलवारी हातात घेऊन बेधुंद पणे नाचणाऱ्या तरुणाईचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

काही दिवसांपूर्वी कल्याण पूर्वेतील तिसगाव पाडा परिसरात एका हळदी समारंभात तलवार हातात नाचविणाऱ्या नवरदेवाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

    टिटवाळा : – कल्याण ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका गावात गणेश विसर्जन सोहळ्यापूर्वी घरासमोर चक्क नंग्या तलावरी हातात घेऊन नाचतानाचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाल्याने कायदा सुव्यवस्थेचे पुरते धिंडवडे निघाले आहेत.

    कल्याण तालुका पोलीस स्टेशन हद्दीत काही महिन्यांपूर्वी बल्याणी येथील वाढदिवसानिमित्त तलवार हातात नाचवित चक्क तलवारीने केक कापल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. काही दिवसांपूर्वी कल्याण पूर्वेतील तिसगाव पाडा परिसरात एका हळदी समारंभात तलवार हातात नाचविणाऱ्या नवरदेवाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

    या दोन्ही प्रकरणी पोलिसांनी सबंधितावर कायदेशीर गुन्हा दाखल केला होता. असे असताना देखील पोलिसांचे भय नसणारयांनी गणपती विसर्जन सोहळ्यापूर्वी घरच्या अगंणात हातात तलवारी घेऊन बेधुंद पणे नंग्या तलवारी नाचविण्याचा व्हिडिओ सोशल मीडिया वर व्हायरल झाल्याने अशा वाढत्या घटनांना पोलिस कसा आळा घालणार असा सवाल यानिमित्ताने उभा ठाकला आहे.

    या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी सत्यता प्रकरणी चौकशी सुरु असून व्हायरल व्हिडिओ टिटवाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आहे का नाही यांची खातरजमा सुरू आहे.

    राजू वंजारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, टिटवाळा पोलीस ठाणे