अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांच्या परदेशी शिक्षणास क्रिमिलेयर लावण्याच्या निर्णयाचा विद्यार्थी भारतीने केला निषेध

कल्याण : अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांनी परदेशी शिकू नये, असा शासन आदेश काढणाऱ्या धनंजय मुंडेच डोकं ठिकाण्यावर आहे का? असा रोखठोक सवाल विद्यार्थी भारती अध्यक्षा मंजिरी धुरी यांनी केला

 कल्याण : अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांनी परदेशी शिकू नये, असा शासन आदेश काढणाऱ्या धनंजय मुंडेच डोकं ठिकाण्यावर आहे का? असा रोखठोक सवाल विद्यार्थी भारती अध्यक्षा मंजिरी धुरी यांनी केला आहे. विद्यार्थ्यांच्या परदेशी शिक्षणात क्रिमिलेयर लावणाऱ्या धनंजय मुंडे यांचा निषेध करत इमेलच्या माध्यमातून हा निर्णय मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे. निर्णय मागे न घेतल्यास विद्यार्थी भारती  ‘शिकू किंवा मरू’  या घोषणेसोबत आंदोलन करण्याचा इशाराही धुरी यांनी दिला आहे.

गेले कित्येक दिवस विद्यार्थी भारती कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीत विद्यार्थ्यांना त्यांची स्कॉलरशिप फेलोशिप लवकरात लवकर देण्यात यावी, ही मागणी करत आहे. त्यांच्याबद्दल काहीच वक्तव्य धनंजय मुंढे करत नाहीत  आणि कोरोनाच्या महाभयंकर परिस्थिती असा निर्णय घेण्याची कुबुद्धी येते तरी कुठून असा प्रश्न राज्य उपाध्यक्ष रत्नदीप आठवले यांनी विचारला आहे. दरम्यान २०१२ मध्ये देखील अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांवर क्रिमिलेयर लावण्यात आले होते तेव्हा विद्यार्थी भारतीने मंत्रालयात टाळे लावा आंदोलन केल्यावर निर्णय रद्द करण्यात आला होता, असे राज्य कार्याध्यक्ष प्रणय घरत यांनी सांगितले. तर २०१५ मध्ये फडणवीस सरकारच्या काळातही असा निर्णय घेण्यात आला होता तेव्हा विद्यार्थी भारती व इतर संघटनांच्या मदतीने हा निर्णय रद्द करन्यात आला होता पण तोच निर्णय आघाडी सरकारच्या काळात धनंजय मुंढे कलमकसाई च्या सल्ल्याने घेत असल्याचा आरोप राज्यसंघटक शुभम राऊत यांनी केला आहे.