विराज हत्या प्रकरणाचा विद्यार्थी भारतीकडून निषेध

कल्याण : पुण्यातील पिंपळे सौदागर भागात वीस वर्षीय तरुण विराज जगताप याची हत्या झाली असून कल्याणमध्ये विद्यार्थी भारतीकडून विराजला आदरांजली वाहत या हत्येचा निषेध नोंदवण्यात आला. अशा प्रकारची

 कल्याण : पुण्यातील पिंपळे सौदागर भागात वीस वर्षीय तरुण विराज जगताप याची हत्या झाली असून कल्याणमध्ये विद्यार्थी भारतीकडून विराजला आदरांजली वाहत या हत्येचा निषेध नोंदवण्यात आला. अशा प्रकारची हत्याप्रकरणे सातत्याने घडू नयेत यासाठी आजच्या तरुणांपुढे मोठे आव्हान आहे. तरुणांनी जातीपलिकडील माणुसकी जपली पाहिजे. जातीव्यवस्था नष्ट करण्याची ताकत तरुण पिढीत आहे. असे मत विद्यार्थी भारती राज्याध्यक्षा मंजिरी धुरी यांनी यावेळी व्यक्त केले.

पुरोगामी व आधुनिक महाराष्ट्र म्हणत असताना महाराष्ट्रात अश्या जातीच्या विळख्यात अडकलेल्या वृत्तीने अनेक तरुणांचे जीव घेतले आहे. या महाराष्ट्रात जातीयतेसाठी अनेक महान नेते लढले? आजही हे घडणे लज्जास्पद बाब असल्याचे छात्रशक्ती संस्थेच्या सेक्रेटरी स्मिता साळुंखे यांनी सांगितले. आजच्या प्रत्येक तरुणाने मनावर घेतले तर जातीयतेला पूर्णविराम देण्यास वेळ लागणार नाही. हे अस का घडते हा प्रश्न मांडून थांबणे पर्याय नाही तर त्यावर कृती करणं गरजेचं आहे. ही वेळ आपल्या कोणावर येईल तेव्हा आपण निषेध नोंदवू, ही वाट पाहिली तर उद्या आपण विराज होऊ  हा तरुणांपुढील आव्हान त्यांनी स्वीकारावे असे मत गणाई संस्थापक किशोर जगताप यांनी व्यक्त केले.