students letter to education minister

खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांची फी(open category students fees issue) कमी करण्यासाठी विद्यार्थी भारतीच्या शिष्टमंडळाने शिक्षणमंत्री उदय सामंत(uday samant) यांची भेट घेत निवेदन दिले.

कल्याण : मुंबई विद्यापीठाच्या समाज कार्याच्या विद्यार्थ्यांची अतिरीक्त फी आकारत असताना विदयार्थी भारतीने लढा देऊन मागासवर्गीय विद्यार्थ्यांची फी ४० हजार वरून अवघे ६४० रुपये केली. त्याचप्रमाणे खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांची देखील फी(open category students fees issue) कमी करण्यासाठी विद्यार्थी भारतीच्या शिष्टमंडळाने शिक्षणमंत्री उदय सामंत(uday samant) यांची भेट घेत निवेदन दिले.

कोरोना महामारी सारख्या महाभयंकर काळात विद्यार्थ्यांनी अव्वाच्या सव्वा फी भरावी कशी ? यातून अनेक शिकू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांची शिक्षणापासून गळती होईल. यामुळे खुल्या वर्गात येणाऱ्या विद्यार्थ्यांची फी कमी करावी यासाठी पाठपुरावा करून विद्यापीठाकडून उत्तर आले नाही. म्हणून अखेर बुधवारी विदयार्थी भारतीच्या राष्ट्रीय अध्यक्षा मंजिरी धुरी, शुभम राऊत, अर्जुन बनसोडे, राज्य सचिव साक्षी भोईर, निलेश परमार, हर्षला गायकवाड आदी कार्यकर्त्यांनी शिक्षण मंत्री उदय सामंत यांची भेट घेतली.

यावेळी कुलगुरूसोबत चर्चा करून खुल्या वर्गामध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांची फी कमी करण्याबाबत मागणी केली. तसेच फी सहा इंस्टॉल मेंट मध्ये भरण्याची मागणी पूर्ण करून घेतली. प्रवेश फी चे रिस्ट्रक्चर करून फी कमी करण्याचे आश्वासन उदय सामंत व कुलगुरूकडून देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना ८ जानेवारी पर्यंत फी भरण्याची तारीख वाढवून देण्याची मागणी ही पूर्ण झाली असून विद्यार्थ्यांनी निश्चिंत राहून शिक्षण घ्यावं, असे आवाहन राष्ट्रीय अध्यक्ष मंजिरी धुरी यांनी केले आहे.