नवी मुंबईत महापालिका निवडणुकांची जोरदार तयारी; आम आदमी पार्टीच्या, सातव्या कार्यालयाचे ऐरोली – सेक्टर ९ मध्ये उदघाटन

आम आदमी पार्टी, संपूर्ण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका देशभरात लढवण्याचा विचार करीत आहे. आप मधील राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य प्रीती शर्मा मेनन यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील ‘आप' प्रथमच नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढवत असून  नवीमुंबईच्या सर्व १११ जागांवर उमेदवार उभे करणार आहे.

    नवी मुंबई : येत्या काही दिवसांत होवू घातलेल्या नवीमुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये आम आदमी पक्षाचा जोरदार सहभाग असणार आहे. कोपरखैरने , वाशी , नेरुळ , ऐरोली येथील कार्यालयाच्या शानदार उदघाटना नंतर, आप महिला अध्यक्ष आणि ऐरोली – वार्ड क्र २३ च्या अध्यक्ष प्रीती शिंदेकर,यांच्या नवी मुंबईतील सातव्या कार्यालयाचे उदघाटन, शिवजयंतीच्या शुभ मुहूर्तावर, पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रीती शर्मा मेनन याच्या हस्ते ऐरोली येथे २१ फेब्रुवारी रोजी करण्यात आले.

    सर्व १११ जागांवर उमेदवार

    आम आदमी पार्टी, संपूर्ण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका देशभरात लढवण्याचा विचार करीत आहे. आप मधील राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य प्रीती शर्मा मेनन यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील ‘आप’ प्रथमच नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढवत असून  नवीमुंबईच्या सर्व १११ जागांवर उमेदवार उभे करणार आहे. नवी मुंबई च्या  जनतेकडून, आप ला अत्यंत उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे. आप च्या, सामान्य जनतेला केंद्रस्तानी ठेवून, सरकारी कारभार करण्याच्या ध्येय धोरणांचे नवी मुंबईकर स्वागतच करीत आहेत असे प्रीती शर्मा मेनन यांनी नमूद केले.  यावेळी कार्यक्रमाला नवी मुंबई अध्यक्ष प्रमोद महाजन, विजय पंजवानी, उमेश शर्मा, उपाध्यक्ष संतोष गवळी, महिला उप अध्यक्ष सौ. सुलोचना शिवानंद, युवक आघाडीचे अध्यक्ष चिन्मय गोडे सोबत समाज माध्यम अधिकारी रूपक तिवारी, मानसी पवार, राकेश पाटील, झाकीर अन्सारी आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते