लॉकडाऊनला तिलांजली देत वाडा शहरात राजरोजपणे सगळी दुकाने उघडी ?

वाडा :संचारबंदी, सोशल अंतर यांना तिलांजली देत आज वाडा शहरात अत्यावश्यक सेवेसह इतर दुकाने उघडली होती. हा प्रकार गांभीर्याने घेतले जात नसल्याचे चित्र आज वाडा शहरात दिसून येत होते. तशी चर्चा

वाडा : संचारबंदी, सोशल अंतर यांना तिलांजली देत आज वाडा शहरात अत्यावश्यक सेवेसह इतर दुकाने उघडली होती. हा प्रकार गांभीर्याने घेतले जात नसल्याचे चित्र आज वाडा शहरात दिसून येत होते. तशी चर्चा जनतेकडून केली जात होती. अत्यावश्यक सेवतील दुकाने  आणि मोटार गॅरेज,कपडे विक्रेते, सराफा दुकाने या सारखी  दुकाने आज उघडण्यात आली होती. या दुकानांबरोबरच वाडा शहरातील वाडा ग्रामीण रुग्णालयाच्या  प्रवेशद्वाराजवळ भाजीपाला दुकाने थाटली होती तर  वाडा बस स्थानकाचा ताबा हा कांदे बटाटे व भाजीपाला विक्रेत्यांनी घेतला होता.

त्याचप्रमाणे इथल्या बँकेत तर पहाटेपासून रांगा लागल्या होत्या.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक खात्यातील आपले पैसे मिळविण्यासाठी तर पाचशेहून अधिक संख्येने बँके खातेदारांनी सामाजिक अंतर न पाळता मोठी रांग लावली होती.एका आदिवासी समाजाची महिला सकाळी ६ वाजता आपले रोजगार हमीचे पैसे मिळविण्यासाठी नंबर लावुन उभी होती.ती त्यासाठी ती गावापासून १० ते १५किमी अंतर कापत शहरी भागातील बँकेत चालत आल्याचे ती सांगत होती. तर काही जण कुण्या एका गावात वस्तीला आले होते. नंतर सकाळी उठून  बँकेसमोर त्यांनी नंबर लावल्याचे ते सांगत होते. दरम्यानच्या काळात  पालघर जिल्ह्यातील वाडा शहरातील वाडा पोलीस ठाण्यात कथित तिहेरी हत्याकांडातील एका आरोपीला कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्याच्या संपर्कातील व्यक्ती म्हणून इथल्या पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी यांच्या सह आरोपींचे असे एकुण  ८४ स्वॅब घेण्यात आले होते.त्यानंतर वाडा शहर ३ मे ते  ७ मे पर्यंत बंद राहिले. स्वॅब घेतेलेल्यांचे रिपोर्ट पुढे निगेटिव्ह आले. अशी एकंदरीत परिस्थिती असताना  कोरानाच्या पार्श्वभूमीवर  वाडा शहरात कोरोनाचे गांभीर्य दिसून येत नाही. वाड्यामध्ये दिवसा आड दुकाने उघडली जाणार असल्याचा निर्णय घेतला असल्याचे वाडा तहसीलदार उध्दव कदम यांनी सांगितले आहे.