वाडा ग्रामीण भागात आज आणखी एक व्यक्ती कोरोनाबाधित

वाडा: पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील ग्रामीण भागात आज एका ३२ वर्षीय पुरुष व्यक्तीचा पॉझिटिव्ह रिपोर्ट आला आहे.त्यामुळे वाडा तालुक्यातील एकुण पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या ४ झाली आहे तर पालघर

 वाडा: पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील ग्रामीण भागात आज एका ३२ वर्षीय पुरुष व्यक्तीचा पॉझिटिव्ह रिपोर्ट आला आहे.त्यामुळे वाडा तालुक्यातील एकुण पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या ४ झाली आहे तर पालघर ग्रामीण जिल्ह्यातील एकूण ६१ झाली आहे.या रुग्णाला पालघरमधील टीमा येथे हलविण्यात आले असून त्याच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध चालू आहे. हा रुग्ण मुंबई येथे कामाला असल्याने तो काही दिवस मुंबई तर काही दिवस गावी येत होता अशी माहिती मिळत आहे. तर त्याच्या संपर्कातील १३ जण क्वारंटाईन केल्याची माहिती वाडा तालुका वैद्यकीय अधिकारी संजय बुरपले यांनी दिली. तसेच गावातील १६५ घरांचे रोज तीन टीम कडून सर्वेक्षण केले जाणार आहे असे, संजय बुरपले यांनी सांगितले.