कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या एका महिलेला कोरोनाची लागण, वाडा तालुक्यातील रुग्णांची संख्या ५

वाडा: वाडा तालुक्यात एका गावातील एक ३२ वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली होती. त्याच्या संपर्कातील घरातील व्यक्तींचे व इतर लोकांचे तपासणी नमुने घेण्यात आले होते.यात त्याच्या

वाडा: वाडा तालुक्यात एका गावातील एक ३२ वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली होती. त्याच्या संपर्कातील घरातील व्यक्तींचे व इतर लोकांचे तपासणी नमुने घेण्यात आले होते.यात त्याच्या संपर्कातील एकुण १३ जणांना क्वारंटाईन करण्यात आले होते. आज यातील १३ जणांचे रिपोर्ट आले. यात १२ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले मात्र पॉझिटिव्ह रुग्णाच्या घरातील ५० वर्षीय एका महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती वाडा तहसिलदार उद्धव कदम व तालुका वैद्यकीय अधिकारी संजय बुरपले यांनी दिली.  या पॉझिटिव्ह रुग्णामुळे वाडा तालुक्यात एकुण पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या ५ झाली असून या महिला रुग्णाला टिमा येथे हलविण्यात येत असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी संजय बुरपले यांनी दिली.

पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील ग्रामीण भागातील एका गावातील एक ३२ वर्षीय पुरुष हा मुंबई येथे अग्निशामक दलात नोकरीस होता. दरम्यानच्या काळात तो त्याच्या गावाहून मुंबई येथे ये जा करीत होता. त्याचा तपासणी अहवाल काही दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आला होता.त्यामुळे त्याच्या गावातील १६५ घरे प्रतिबंधित व तीन टीमकडून तपासणी मोहीम सुरू केली होती. या आजच्या १३ जणांचा रिपोर्टमध्ये एकच पॉझिटिव्ह महिला रुग्ण आढळलून आली.