पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात आज ३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद, तिघांच्या संपर्कातील २४ जण क्वारंटाईन

वाडा: पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने खळबळ निर्माण झाली आहे.आजच्या तीन वाजताच्या अहवालात वाडा तालुक्यातील तीन जणांचा कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आला. यात ३३ वर्षीय

वाडा:पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने खळबळ निर्माण झाली आहे.आजच्या तीन वाजताच्या अहवालात वाडा तालुक्यातील तीन जणांचा कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आला. यात ३३ वर्षीय पुरुष  वाडा येथील रहिवासी असून उत्तर प्रदेश येथे प्रवासाचा इतिहास असल्यामुळे  कोरोना चाचणी केली असता पॉझिटिव्ह आढळून आला. २२ वर्षीय स्त्री  वाडा येथील रहिवासी असून रत्नागिरी येथे प्रवासाचा इतिहास असल्यामुळे  कोरोना चाचणी केली असता पॉझिटिव्ह आढळून आली. तसेच १२ वर्षीय स्त्री चा पनवेल येथे प्रवासाचा इतिहास असल्यामुळे करोना चाचणी केली असता पॉझिटिव्ह आढळून आली. त्यामुळे पालघर ग्रामीण जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण  ३८ झाले आहेत. या तीन रुग्णाच्या संपर्कातील २४ जणांना वाडा जवळच एका ठिकाणी क्वारंटाईन करण्यात येणार असल्याची माहिती वाडा वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय बुरपल्ले यांनी दिली. तसेच या तीन रुग्णांना टीमा येथे हलविणयात येत असल्याची माहिती जिल्हा सिव्हिल सर्जन कांचन वानेरे यांनी दिली.

दरम्यानच्या काळात वाडा बाजारपेेतील दुकाने सर्वच खुली होती. सोशल अंतरचे तीनतेरा वाजले होते. पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण नव्हता मात्र दरम्यानच्या काळात गडचिंचले प्रकरणातील एक आरोपी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने तेथील पोलिस कर्मचारी आणि आरोपींची चाचणी घेतली होती. त्यात बहुतांशी लोकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले होते.