वाडा पोलिसांनी केले दंगल नियंत्रण उपाययोजनेचे प्रात्यक्षिक

वाडा :पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील पोलीस ठाणे अंतर्गत जातीय/धार्मिक ताण तणाव निर्माण होवू नये, सार्वजनिक शांतता, एकता अबाधित राहावी, दंगली झाल्याच तर प्रतिबंधात्मक उपाययोजना करून त्या

वाडा :पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील पोलीस ठाणे अंतर्गत जातीय/धार्मिक ताण तणाव निर्माण होवू नये, सार्वजनिक शांतता, एकता अबाधित राहावी, दंगली झाल्याच तर प्रतिबंधात्मक उपाययोजना करून त्या नियंत्रणात आणणे व दंगली घडू नये यासाठी परिणामकारक उपाययोजना करता येणे आवश्यक आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये, हेही लक्षात घ्यायला हवे. यासाठी पालघर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सोशल डिस्टन्स राखून दंगल नियंत्रण योजना राबविण्यात आली. त्याचे प्रात्यक्षिक वाडा शहरातील जगताप मैदान येथे २६ एप्रिल रोजी सायंकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत पार पडले. 

यावेळी वाडा पोलीस स्टेशनचे ०३ अधिकारी. १७ कर्मचारी, ०५ होमगार्ड, पालघर मुख्यालयाचे ०१ अधिकारी व ०६ कर्मचारी, वसई आरसीपीचे कासा पोस्टे येथे बंदोबस्त करीता असलेले १३ कर्मचारी व चालक असे हजर होते. यावेळी  टीएस ग्रेनेड०४, डीएम ग्रेनेड ०२,स्टन ग्रेनेड ०१,टीएसएल०३, स्टन सेल-०४, स्पड ०३ यांचे प्रात्यक्षिक घेण्यात आले.