tuar dal price

दिवाळीच्या तोंडावर पाठ थोपटून घेण्यासाठी वाड्यातील(wada) तिन्ही आमदारांनी घाईगडबडीने भात खरेदी केंद्रांची उद्घाटने केली. मात्र ही उद्घाटने होऊन १५ ते २० दिवस झाले तरी अजुनपर्यंत एकाही खरेदी केंद्रावर भाताची खरेदी(rice sell process not started) सुरु झालेली नाही. भात खरेदी करण्यासाठी बारदाणे म्हणजेच पोती उपलब्ध नसल्याने भात अभावी रखडली असल्याचे समोर आले आहे.

वाडा : दिवाळीच्या तोंडावर पाठ थोपटून घेण्यासाठी वाड्यातील(wada) तिन्ही आमदारांनी घाईगडबडीने भात खरेदी केंद्रांची उद्घाटने केली. मात्र ही उद्घाटने होऊन १५ ते २० दिवस झाले तरी अजुनपर्यंत एकाही खरेदी केंद्रावर भाताची खरेदी(rice sell process not started) सुरु झालेली नाही. भात खरेदी करण्यासाठी बारदाणे म्हणजेच पोती उपलब्ध नसल्याने भात अभावी रखडली असल्याचे समोर आले आहे.

वाडा तालुका हा भाताचे कोठार म्हणून ओळखला जातो. येथील सुमारे १४ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर भाताचे पीक घेतले जाते. यावर्षी कोरोनाचे सावट व परतीच्या पावसाचे संकट असतानाही येथील शेतकऱ्यांनी अतोनात मेहनत करून थोडेफार भाताचे पीक घरात आणले आहे. जे शेतकरी निव्वळ भात पिकावर अवलंबून आहेत, अशा शेतकऱ्यांना भाताची विक्री करुन संसाराचा गाडा चालवावा लागतो. तसेच शेतीची अवजारे, भात बियाणे, खते, औषधे यांची उधारी फेडावी लागत असते, यासाठी हे शेतकरी भाताची विक्री करण्याची घाई करीत असतात. मात्र येथील खरेदी केंद्रांची उद्घाटने होऊन २० दिवस झाले तरी अजुनपर्यंत खरेदी केंद्र सुरु करण्यात आलेली नसल्याने मातीमोल भावाने या शेतकऱ्यांवर व्यापाऱ्यांना भात विकावे लागत आहे.

वाडा तालुक्याचे तीन भाग तीन विधानसभा मतदारसंघांना जोडले गेले आहेत. शहापूर मतदार संघाचे आमदार दौलत दरोडा, भिवंडी ग्रामीण मतदार संघाचे आमदार शांताराम मोरे व विक्रमगड मतदार संघाचे आमदार सुनील भुसारा हे तीन आमदार वाडा तालुक्याचे प्रतिनिधित्व करतात. या तिन्ही आमदारांनी दिवाळी पुर्वी घाईघाईने भात खरेदी केंद्रांची उद्घाटने केली. मात्र प्रत्यक्षात ही केंद्र आजतागायत सुरु झालेली नसल्याने शेतकरी संताप व्यक्त करीत आहेत.

भिवंडी ग्रामीण या मतदार संघात वाडा तालुक्यातील ७० हुन अधिक गावे आहेत. येथील शेतकऱ्यांचे भात हेच एकमेव पीक असताना या ७० गावांसाठी एकही भात खरेदी केंद्र निर्माण करण्यात आलेले नाही. तालुक्यातील उर्वरित गावांसाठी एकूण ९ खरेदी केंद्रे मंजुर करण्यात आली असून या ठिकाणी अजूनपर्यंत खरेदी सुरु करण्यात आलेली नाही.
दरम्यान गेल्या वर्षी भाताची साठवणूक करण्यासाठी काही शेतकऱ्यांनी तसेच सेवा सहकारी संस्थांनी गोदामे आदिवासी विकास महामंडळाला भाड्याने दिली होती. त्याचे भाडे अजुनही न दिल्याने महामंडळाला पुन्हा गोदामे भाड्याने देण्यास शेतकऱ्यांनी नकार दिला आहे.

स्वत:च्या बारदाणातून भात विक्रीस आणणाऱ्या शेतकऱ्यांच्या भाताची खरेदी सुरु करण्यात आली आहे. महामंडळाची बारदाणे आल्यानंतर शेतकऱ्यांना ती परत केली जातील.- राजेश पवार – उप प्रादेशिक व्यवस्थापक, मोखाडा/वाडा

भात खरेदीसाठी बारदाणाची टंचाई तसेच महामंडळाकडून खरेदी केलेले धान्य साठविण्यासाठी गोदामात जागा नसणे, ही दरवर्षीची समस्या असून यावर कायमस्वरूपी उपाययोजना करून भात खरेदी त्वरित करण्याची आवश्यकता आहे.- नितीन पाटील , भात उत्पादक शेतकरी