आम्हाला व्यवसाय सुरु करु द्या – वडापाव विक्रेत्यांचे तहसीलदारांकडे गाऱ्हाणे

मुरबाड: केवळ अत्यावश्यक सेवा व्यवसाय सुरू असल्याने सध्या हातावर पोट असणाऱ्यांची परवड सुरू आहे. याच समस्येने ग्रस्त असणाऱ्या मुरबाडच्या वडापाव विक्रेत्यांनी व्यवसाय सुरू करण्यास परवानगी मिळण्यासाठी

मुरबाड: केवळ अत्यावश्यक सेवा व्यवसाय सुरू असल्याने सध्या हातावर पोट असणाऱ्यांची परवड सुरू आहे. याच समस्येने ग्रस्त असणाऱ्या मुरबाडच्या वडापाव विक्रेत्यांनी व्यवसाय सुरू करण्यास परवानगी मिळण्यासाठी तहसीलदारांना साकडे घातले. मुरबाड शहर हद्दीत साधारणतः पन्नास ते साठ वडापाव विक्रेते व्यावसायिक आहेत. लॉकडाऊन काळात या व्यावसायिकांचे व्यवसाय ठप्प असल्याने त्यांच्या कुटुंबियांची उपासमार सुरू आहे.सध्यातरी  विविध संस्था, कार्यकर्ते हे पुरवत असलेल्या किराणा किटवर या कुटुंबांची गुजराण सुरू आहे. त्यामुळे व्यवसाय सुरू करण्यास सशर्त परवानगी मिळावी, अशी मागणी त्यांनी मुरबाड तहसीलदारांकडे  केली आहे.