पूर्ववैमनस्यातून वाईन शॉपच्या वेटरला मारहाण

भिवंडी: माणकोली येथील चेतन वाईन शॉपमध्ये काम करणाऱ्या वेटरला एका इसमाने पूर्ववैमनस्यातून शिवीगाळ करून लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे.या मारहाण प्रकरणी आरोपीत इसमाविरोधात

 भिवंडी: माणकोली येथील चेतन वाईन शॉपमध्ये काम करणाऱ्या वेटरला एका इसमाने पूर्ववैमनस्यातून शिवीगाळ करून लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे.या मारहाण प्रकरणी आरोपीत इसमाविरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रंजित असे गुन्हा दाखल झालेल्या इसमाचे नाव असून त्याने मागील भांडणाचा राग मनात धरून सतिष रामसेवक पाल हा त्याच्या मॅनेजरशी चर्चा करत असताना अर्वाच्य शिवीगाळ करून लाकडी दांडक्याने त्याच्या डोक्यावर मारून त्यास गंभीर जखमी केले आहे. या मारहाण प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास नारपोली पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार मुकेश भोसले करीत आहेत.