वेटरला राग झाला अनावर, संतापून बारगर्लचा गळा दाबून केली हत्या – पोलिसांनी १६ तासांमध्ये लावला छडा

बारमध्ये काम करणाऱ्या वेटरने एका बारगर्लचा(waiter killed bargirl) तिच्या राहत्या घरी गळा आवळून खून केल्याची घटना पोलिसांनी १६ तासात उघडकीस आणली आहे.

    कल्याण : बारमध्ये (bar)काम करणाऱ्या वेटरने एका बारगर्लचा(bar girl kiled) तिच्या राहत्या घरी गळा आवळून खून केल्याची घटना पोलिसांनी १६ तासात उघडकीस आणली आहे. शुक्रवारी रात्री उशिरा घडलेल्या घटनेने मारेकऱ्याला अटक करण्याचे आव्हान पोलिसांना होते.पोलिसांनी मिळालेल्या धागेदोरे आधारे वेटरच्या मुसक्या आवळून त्याला अटक केली.कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाने ही कामगिरी केली.

    पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, श्रीनिवास बसवा मडीवाल (३२) असे अटक केलेल्या वेटरचे नाव आहे. ४७ वर्षीय बारबाला आरती सकपाळ ही डोंबिवली पश्चिम कोपर रोड परिसरा कुमार हौसिंग सोसायटीत राहत होती. उदरनिर्वाहासाठी ती कल्याणमधील रुचिरा बारमध्ये काम करत होती .लॉकडाऊनमध्ये तिची नोकरी गेल्याने ती गेल्या काही महिन्यांपासून मच्छी विक्री करत उदरनिर्वाह करत होती. मृत आरतीच्या नातेवाईकांनी तिला फोन केला होता.मात्र फोन न उचलल्याने त्यांनी घरी जाऊन पाहिले असता त्यांना आरती मृतावतस्थेत आढळली.

    या प्रकरणी विष्णू नगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाने तपासाची चक्रे फिरवली असता पोलिसांना याच बारमध्ये वेटरचे काम केलेल्या श्रीनिवासकडे संशयाची सुई गेली.पोलिसांनी १६ तासांत श्रीनिवासला अटक केली. या दोघांचे प्रेमसंबंध होते.दोघांचा वाद झाल्याने त्याने रागाच्या भरात आरतीचा गळा दाबून हत्या केली.