भिवंडीतील प्राथमिक आरोग्य केंद्राची उल्लेखनीय कामगिरी

भिवंडी: भिवंडी तालुक्यातील प्रसिद्ध देवस्थान व पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाणारे वज्रेश्वरी येथे जनतेसाठी प्राथमिक आरोग्य सुविधा पुरविणारे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. सद्यस्थितीत कोरोना विषाणू

 भिवंडी: भिवंडी तालुक्यातील प्रसिद्ध देवस्थान व पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाणारे वज्रेश्वरी येथे जनतेसाठी प्राथमिक आरोग्य सुविधा पुरविणारे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. सद्यस्थितीत कोरोना विषाणू संसर्ग फैलाव शहराबरोबर ग्रामीण भागातही होत आहे. मात्र येथील वैद्यकीय अधिकारी  डॉ.एम.एम.कावळे आणि    इतर कर्मचारी स्वतःचा जीव धोक्यात घालून येथील नागरिकांचा जीव कोरोनापासून वाचविण्यासाठी अहोरात्र झटत आहेत.या त्यांच्या कर्तव्यदक्ष उल्लेखनीय कामगिरीबद्दल परिसरातील नागरिकांकडून अभिनंदन केले जात आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्र वज्रेश्वरीच्या कार्यक्षेत्रात आत्तापर्यंत झिडके, अंबाडीनाका, दिघाशी, अकलोली, अकलोली  कुंड  वज्रेश्वरी, गणेशपुरी व वेढे आदी गावात एकूण २० कोरोना रूग्ण आढळले आहेत. त्यापैकी झिडके आणि वेढे या गावातील रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.एम. एम.कावळे यांना कार्यक्षेत्रातील ज्या गावात रुग्णांची माहिती मिळते त्या गावात वैद्यकीय पथकासह तात्काळ पोहोचतात व त्या रूग्णाला कोव्हीड उपचार केंद्राच्या ठिकाणी नेण्याची जबाबदारी पार पाडत आहेत. त्यांच्यासोबत केंद्रातील आरोग्य कर्मचारी तसेच गणेशपुरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस अधिकारी  महेश सगडे, महेंद्र गावडे तसेच पोलीस कर्मचारी के. एन. कशिवले (पोलीस हवालदार) डी. टी. चन्ने, एन. एम. भेरे (पोलीस नायक) आदी आपले चोख कर्तव्य बजावत आहेत. पोलीस आणि आरोग्य विभागातील कर्मचार्‍यांची उल्लेखनीय कामगिरी पाहून परिसरातील नागरिकांकडून आभार व्यक्त केले जात आहेत.त्याचबरोबर येथील नागरिक व ग्रामपंचायतीकडून मिळणाऱ्या चांगल्या सहकार्याबद्दल दोन्ही विभागाच्यावतीने समाधान व्यक्त केले जात आहे.