प्रभागसमिती निहाय रूग्णवाहिका उपलब्ध  , नागरिकांनी  रुग्ण नेण्यासाठी रुग्ण वाहिकाचा वापर करावा : आयुक्त डॉ . पंकज आशिया

भिवंडी : कोरोना रुग्णांची शहरातील वाढतील संख्या विचारात घेता या रुग्णांना तातडीने औषधोपचार करता रुग्णालयात न्यावे लागत आहे. याकामी रुग्णवाहिकांची आवश्यकता भासते ही बाब लक्षात घेऊन

भिवंडी : कोरोना  रुग्णांची शहरातील वाढतील संख्या विचारात घेता या रुग्णांना तातडीने औषधोपचार करता  रुग्णालयात न्यावे लागत आहे. याकामी रुग्णवाहिकांची आवश्यकता भासते ही बाब लक्षात घेऊन महापालिका आयुक्त डॉक्टर पंकज आशिया यांनी तातडीने प्रत्येक प्रभाग समिती निहाय दोन दोन रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या आहेत. याकामी प्रत्येक प्रभाग समिती मधील आपत्कालीन कक्ष येथे नोडल अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे व  त्यांच्या कार्यालय नंबर व मोबाईल नंबर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच मुख्य आपत्कालीन कक्ष  प्रमुख फैझल तातली  यांचे  नियंत्रणाखाली नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून त्या ठिकाणी देखील रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आपत्ती निकडीच्या कामाकरिता पालिकेत आपत्कालीन कशात  नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून या ठिकाणी २४ तास अधिकारी कर्मचारी उपस्थित असणार आहेत. नागरिकांना,  येणाऱ्या समस्या तसेच खाजगी रुग्णालयात रुग्ण दाखल  करताना येणं-.या अडचणी ,  अन्य तक्रारी सोडवण्यासाठी महानगरपालिकने टोल फ्री नंबर १८००२३३११०२  असा आहे, तर आपत्कालीन कशाचा नंबर २५००४९  , २३२३९८  असा आहे. या नंबरवर संपर्क साधावा,.असे आवाहन आयुक्त  यांनी केले आहे.    त्याचबरोबर टाटा आमंत्रा,  रईस हायस्कूल,ओसवाल हायस्कूल या कोरोणा केंद्रावर देखील रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.तसेच नागरिकांनी, रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णाला रुग्णालय नेताना रुग्णवाहिकेत  न्यावे असे आवाहन देखील आयुक्त डॉक्टर पंकज आशिया यांनी केले आहे. याच बरोबर इंदिरा गांधी हॉस्पिटल, टाटा आमन्त्रा येथे शववाहिका  उपलब्ध करून दिल्या आहेत. अशी माहिती आयुक्त यांनी दिली आहे.