kalyan dumping ground protest

कल्याणमधील(kalyan) आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडला(adharwadi dumping ground) लागून साठे नगर आहे. या साठेनगरमध्ये शेकडोंच्या संख्येने कचरावेचक राहतात. गेल्या ४० वर्षापासून आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडमधून ४५० हून अधिक कुटुंबीयांचा कचरा वेगळा करीत भंगार जमा करीत हे विक्री करून त्यांचा उदरनिर्वाह चालतो.

कल्याण : कल्याणमधील(kalyan) आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडला(adharwadi dumping ground) लागून साठे नगर आहे. या साठेनगरमध्ये शेकडोंच्या संख्येने कचरावेचक राहतात. गेल्या ४० वर्षापासून आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडमधून ४५० हून अधिक कुटुंबीयांचा कचरा वेगळा करीत भंगार जमा करीत हे विक्री करून त्यांचा उदरनिर्वाह चालतो. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने शहराला कचरामुक्त करण्यासाठी नवीन मोहीम सुरू केली आहे. त्याअंतर्गत ओला कचरा आणि सुका कचऱ्याच्या विलगीकरण जागोजागी केला जातो, त्यामुळे आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडमध्ये कचऱ्याची आवक कमी झाली आहे. सध्या डम्पिंग ग्राउंड बंद करायचे आहे यामुळे कचरा वेचकांच्या समोर रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.

कल्याण डोंबिवली पालिकेने सुमारे २७ जणांना कचरावेचक म्हणून ओळखपत्र दिले असून आज सकाळी शेकडोंच्या संख्येत कचरा वेचक महिला पुरुष आधारवाडी डम्पिंग डम्पिंग ग्राऊंडच्या गेटवर जमा झाले. कचरा घेऊन येणाऱ्या गाड्या थांबवल्या यादरम्यान पोलीस आणि आंदोलक कचरा वेचकांमध्ये जोरदार झटापट झाली .

सध्या डम्पिंग ग्राऊंडमध्ये टाकण्याचे काम सुरु झाले आहे. मात्र आंदोलनकारी डम्पिंग ग्राऊंडच्या प्रवेशद्वारावर थांब मारून बसले आहे. आंदोलन करता कचरावेचकांची मागणी आहे की कचरा विलगीकरण काम त्यांना मिळाला पाहिजे मग त्यांना रोजगार मिळेल. आता महापालिका यावर तोडगा कसा काढते,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या आंंदोलनकर्त्यांमद्ये स्वाभीमानी सामाजिक संघटना ,भीम सेना महाराष्ट्र अध्यक्ष नीतिका राव यांनी ठोस भुमिका मांडित या कचरावेचकांना कचरा प्लॅन्ट येथे कचरा वेचण्याची मुभा मिळावी तसेच कचरावेचकांना मनपाने ओळखपत्र द्यावे जेणेकरून सोसायटीमध्ये जात सुका कचरा वेचित त्या भंगारातुन त्यांच्या रोजगाराला मदत होईल. तसेच कचरावेचकांना कंत्राटी पध्दतीने कचरा प्लॅन्टवर कामावर घ्यावे. झोपडपट्टी पुनर्वसन अंतर्गत घरे उपलब्ध कचरावेचकांना घरे घ्यावीत. अशा मागण्या भीम सेना अध्यक्ष महाराष्ट्र नितिका राव यांनी कल्याण डोंबिवली मनपा आयुक्तांना या आंदोलना निमित्ताने पत्र देत केल्या आहेत.