ठाणे जिल्ह्यातील शहरांना पाणीकपातीशिवाय होणार पाणीपुरवठा

बारवी धरण ६१ टक्के भरले आहे. धरणाची उंची वाढवल्याने जुन्या क्षमतेनुसार धरण ८८ टक्के भरल्याने या धरणाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शहरांना पाणीकपाती शिवाय पाणीपुरवठा होऊ शकतो असा विश्वास एमआयडीसीकडून व्यक्त होत आहे. बारवी धरणाच्या उंची वाढीचे काम पूर्ण झाल्याने धरणात अतिरिक्त ४० टक्के पाणीसाठा होत आहे.

मुरबाड – गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे बारवी धरण ६१ टक्के भरले आहे. धरणाची उंची वाढवल्याने जुन्या क्षमतेनुसार धरण ८८ टक्के भरल्याने या धरणाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शहरांना पाणीकपाती शिवाय पाणीपुरवठा होऊ शकतो असा विश्वास एमआयडीसीकडून व्यक्त होत आहे. बारवी धरणाच्या उंची वाढीचे काम पूर्ण झाल्याने धरणात अतिरिक्त ४० टक्के पाणीसाठा होत आहे.

यापूर्वी धरणात २३५ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा होत होता. उंचीवाढीमुळे ही क्षमता वाढून ३४० दशलक्ष घनमित्र इतकी झाली आहे.त्यामुळे सध्या धरण जरी ६१ टक्के भरले असले तरी जुन्या क्षमतेनुसार धरणात सध्या ८८ टक्के म्हणजेच २०७ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा असून तो शहरांना विनाकपात पुरवण्यास पुरेसा आहे.

मागील वर्षी जोरदार पावसामुळे जुलै महिन्यातच धरण नव्या क्षमतेने भरले होते. या वर्षी जून, जुलै महिन्यात धरणक्षेत्रात पुरेसा पाऊस पडला नाही, मात्र सध्या सुरू असलेला पाऊस काही दिवस असाच राहिल्यास धरणात अधिकचा पाणीसाठा होऊ शकतो.  त्यामुळे शहरांना पाणीकपातीशिवाय सुरळीत पाणीपुरवठा होऊ शकतो, अशी खात्री एमआयडीसीकडून वर्तवली जात आहे.