water way bhumipujan

डोंबिवलीकरांना ठाणे किंवा भिवंडी प्रवास आता जलमार्ग(water way between dombivali , thane and bhivandi) माध्यमातून करता येणार आहे. कुंभारखाण पाडा भागात खाडी किनाऱ्याला आमदार निधीतून बांधण्यात येणाऱ्या गणेश विसर्जन घाटाजवळ जेट्टी प्रकल्प होणार असून जेट्टीच्या माध्यमातून प्रवासी जलवाहतूक साध्या होणार आहे. या विकास प्रकल्पामुळे स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार असून येथील नागरिकांना जलवाहतुकीचा आनंद मिळणार आहे.

डोंबिवली : नेहमीच्या वाहतूक कोंडीमुळे(traffic jam) हैराण होणाऱ्या डोंबिवलीकरांसाठी(dombivali) एक अनोख्या उपक्रमाचा मार्ग आमदार रवींद्र चव्हाण यांच्या प्रयत्नातून साकार होणार आहे. डोंबिवलीकरांना ठाणे किंवा भिवंडी प्रवास आता जलमार्ग माध्यमातून करता येणार आहे. कुंभारखाण पाडा भागात खाडी किनाऱ्याला आमदार निधीतून बांधण्यात येणाऱ्या गणेश विसर्जन घाटाजवळ जेट्टी प्रकल्प होणार असून जेट्टीच्या माध्यमातून प्रवासी जलवाहतूक साध्या होणार आहे.(water way transportation will be done between dombivali thane and bhivandi jetty bhumipujan done) या विकास प्रकल्पामुळे स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार असून येथील नागरिकांना जलवाहतुकीचा आनंद मिळणार आहे.

डोंबिवली पश्चिम येथील गणेशनगर येथे आमदार रविंद्र चव्हाण यांच्या आमदार निधीतून अत्यंत महत्त्वाचे असे जलवाहतूक, गणेश विसर्जन घाट व पर्यटन स्थळ, जेट्टीच्या माध्यमातून स्थानिक भुमीपुत्रांना रोजगार उपलब्ध व्हावा तसेच डोंबिवलीकरांना पर्यटनाच्या दृष्टीने चोळे गणेशनगर खाडी रस्ता, जेट्टी व पोहोच रस्ताच्या बांधकामाचे भुमीपुजन समारंभ नुकताच पार पडला, यावेळी स्थानिक नगरसेवक विकास म्हात्रे, जनार्दन म्हात्रे, प्रदीप जोशी, नगरसेविका विद्याताई म्हात्रे, कृष्णा पाटील, विजय पाटील, मनीष शिंदे, प्रदीप चौधरी, पवन पाटील, समीर चिटणीस, राजेश म्हात्रे आदी उपस्थित होते.

डोंबिवली पश्चिमेत कुंभारखाण पाडा भागात खाडी किनाऱ्याला सध्या चौपाटीचे स्वरूप येऊ लागले असून येथील रहिवाशांना पर्यटनासाठी हा परिसर खुणावू लागला आहे. या चौपाटीच्या भागात महापालिकेने रस्ता, आसन व्यवस्था, घाट बांधून दिल्याने डोंबिवलीतील नागरिकांना फेरफटका मारण्यासाठी एक जागा उपलब्ध झाली आहे.

महापालिकेने या चौपाटीकडे जाण्यासाठी रस्ता बांधून दिला आहे. खाडीत उतरण्यासाठी घाटाची व्यवस्था केली आहे. बसण्याची व्यवस्था तयार केली आहे. आजूबाजूला विस्तीर्ण मोकळी जमीन, त्यावरील हिरवाई लक्ष वेधून घेते. या चौपाटी निर्मितीसाठी स्थानिक नगरसेवक विकास म्हात्रे यांनी पाठपुरावा केला. डोंबिवलीकरांना पश्चिमेतील मोठा गाव रेतीबंदर खाडी, जुनी डोंबिवली गणेश घाट, सावळाराम महाराज क्रीडा संकुल, भोपर टेकडी रेल्वेग्राउंड, भागशाळा मैदान आदी ठिकाणेच फक्त फिरण्यासाठी असल्याने आता त्यात कुंभारखाण पाडाची अधिक भर पडणार आहे.

याबाबत नगरसेवक विकास म्हात्रे म्हणाले, कुंभारखाण पाडा भागात खाडी किनाऱ्याला गणेश विसर्जन घाटाजवळ जेट्टी प्रकल्प होणार असून जेट्टीच्या माध्यमातून एक अनोखी संधी मिळणार आहे. जेट्टीमुळे दोनचाकी व चारचाकी गाड्याही जेट्टीद्वारे प्रवाश्यांना नेता येतील. ठाणे, भिवंडी साधी ही सुविधा होवू शकेल. परणु काही वेळा भरती-ओहटी वर लक्ष ठेऊन प्रवास करावा लागेल. मात्र जलवाहतूक प्रेमीना जलवाहतुकीचा आणि फिरण्याचा आनंद घेता येईल. शिवाय काही प्रमाणात चौपाटीमुळे रोजगाराची संधी निर्माण होईल.