वसई-ठाणे-कल्याण दरम्यान लवकरच जलमार्ग

मुंबई : वसई-ठाणे-कल्याण दरम्यान पुढच्या पावसाळ्यापूर्वी जल वाहतूक सुरु करण्याचे आश्वासन केंद्रीय परिवहन राज्यमंत्री मनसुख मांडविया यांनी ई बैठकीत दिल्याची माहिती शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांनी दिली आहे. रस्त्यावरील वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढत आहे, अशा स्थितीत रस्त्यावरील वाहतूक कमी व्हावी, या उद्देशाने वसई-ठाणे-कल्याण या ५४ किलोमीटर मार्गावर जलवाहतूक प्रस्तावित आहे. या मार्गावर प्रवाशांसाठी १० छोट्या जेट्टीही उभारण्यात येणार आहेत. हा प्रस्तावित मार्ग ठाणे, मुंबई, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, वसई-विरार, मिरा-भाईंदर या टप्प्यांतून जाणार आहे. यासाठई २१ कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित आहे. याचा प्रकल्प अहवाल ठाणे महापालिकेने केंदंरीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरींकडे सोपविल्याची माहिती, राजन विचारे यांच्या कार्यालयाने दिली आहे.या जल वाहतुकीसाठी केंद्र आणि राज्य या दोन्हींकडून निधी मिळणार आहे. पीपीपी मॉडेलनुसार हा जलमार्ग सतित्वात येणार आहे. सोमवारी राज्यातील जलवाहतूक विकास कार्याबाबत झालेल्या बैठकीत या योजनेला गती देण्याबाबत विस्तृत चर्चा करण्यात आली.