”आम्ही ती स्मशाने ज्यांना प्रेतही न वाली”

इंदिरा नगर  स्मशानभूमीची  दुरावस्था! ; टिटवाळ्यात मेल्यानंतर ही मरणयातना                         

टिटवाळा : टिटवाळा पूर्वेतील इंदिरा नगर स्मशानभूमीची दुरावस्था झाली असून अंत्यसंस्कारासाठीच्या मृतदेहांना मरणानंतरही  यातना सहन करण्याची वेळ आली आहे.     

टिटवाळाचे वाढते शहरीकरण, वाढती  लोखसंख्या पाहता टिटवाळा पूर्वेत सद्यस्थितीत दोन स्मशानभूमी असून  इंदिरा नगर  स्मशानभूमीची  दुरावस्था झाली असून छप्पराचे पत्रे उडाले आहेत.  तसेच  छताचे अँगल लोंबकाळत आहेत. अशा अवस्थेत अंत्यसंस्कार करणे शक्य नसल्याने तेथून लांब असणाऱ्या गणेश मंदिरा मागील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी जावे लागते.  तिथेही कधीकधी मृतदेहावर अंतिम अग्नी संस्कार सुरू असल्यास  मृतदेह स्मशाना बाहेर ठेवत मृतदेहावर अंत्यसंस्कारासाठी तास न तास  वाट पाहवी लागत असल्याने “मेल्यानंतर ही मरण यातना” अशी वेळ येते. टिटवाळाकर मनपाचा कर भरत असून करदात्यांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहवे लागत आहे. इंदिरा नगर  स्मशानभूमीचे नुतनीकरण  केले गेले नाही तर इंदिरा नगर  स्मशानभूमीचे नूतनीकरण होईपर्यंत मनपाच्या आवारात अंत्यसंस्कार करण्यात येतील अशा इशाराचे पत्र  विजय देशेकर (शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष कल्याण तालुका प्रमुख) यांनी क.डो.म.पा.आयुक्त यांना दिले आहे.