तोल ढासळलेल्यांवर बोलायचं नसतं, उपचार करायचे असतात; संजय राऊतांची भाजपच्या या नेत्यावर खोचक टीका

क्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेलाही संजय राऊत यांनी उत्तर दिले. फडणवीस माझ्यावरच निशाणा साधतील. त्यांची टीका मी गंभीरपणे घेत नाही. ते माझे मित्र आहेत, मित्र राहतील, त्यांचं दुःख मी समजू शकतो. माझ्यामुळे त्यांची सत्ता गेली. ते सत्तेत येऊ शकले नाहीत. त्यामुळे ते दुःखी आहेत. पण त्यांना माझ्यावर टीका करण्यात आनंद वाटत असेल तर त्यांनी खुशाल टीका करावी, पुढे साडेतीन वर्षे टीका करून त्यांनी आनंद घ्यावा, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

    ठाणे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंवर टीका केली होती. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी जोरदार पलटवार केला आहे. चंद्रकांतदादांचा तोल ढासळला आहे, त्यांच्यावर उपचाराची गरज आहे, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली. संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना चंद्रकांतदादांवर निशाणा साधला. तुम्हीच म्हणालात ना चंद्रकांतदादांचा तोल ढासळला आहे. मग तोल ढासळलेल्यांवर बोलायचं नसतं. त्यांच्यावर उपचाराची गरज असते, अशी खोचक टीका राऊत यांनी केली.

    दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेलाही संजय राऊत यांनी उत्तर दिले. फडणवीस माझ्यावरच निशाणा साधतील. त्यांची टीका मी गंभीरपणे घेत नाही. ते माझे मित्र आहेत, मित्र राहतील, त्यांचं दुःख मी समजू शकतो. माझ्यामुळे त्यांची सत्ता गेली. ते सत्तेत येऊ शकले नाहीत. त्यामुळे ते दुःखी आहेत. पण त्यांना माझ्यावर टीका करण्यात आनंद वाटत असेल तर त्यांनी खुशाल टीका करावी, पुढे साडेतीन वर्षे टीका करून त्यांनी आनंद घ्यावा, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

    मुंबई महानगरपालिका निवडणूका पुढे ढकलण्याचा घाट घातला जात असल्याचा विरोधकांचा आरोप राऊतांनी फेटाळून लावला. विरोधी पक्षाला निवडणुकीची एवढी घाई का झाली आहे, त्यांना कुणी सांगितलं अशा प्रकारचा काही निर्णय होत आहे? ज्या काही गुप्तहेरांनी त्यांना माहिती दिली तर ती चुकीची माहिती आहे. निवडणुकांसंदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि निवडणूक आयुक्तच सांगतिल. ते अधिकारीत व्यक्ती आहेत. तुम्ही कशाला जनतेत संभ्रम निर्माण करतात, हा सवालही संजय राऊत यांनी केला.