कल्याण – सीए फाऊंडेशनच्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी बसची सुविधा उपलब्ध करित युवासेना मदतीला धावली

कल्याण-सीए फाऊंडेशनच्या परिक्षेसाठी डोंबिवलीतील (Dombivli ) सुमारे २०० विद्यार्थ्यांचे केंद्र कल्याणमधील मुथा काँलेज (Mutha College) , अग्रवाल काँलेज, युनिक काँलेजमध्ये आले असून या परिक्षेला जाण्या येण्यासाठी विद्यार्थींसाठी शिवसेनेच्या युवा सेनेतर्फे बससेवा (Bus Service) मोफत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

कल्याण : कल्याण-सीए फाऊंडेशनच्या (Kalyan- CA Foundation ) परिक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना (Students) कल्याणातील परीक्षा केंद्रात परीक्षा दरम्यान जाण्या येण्यासाठी बसची सुविधा उपलब्ध करून परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या मदतीला युवासेना धावली आहे. कल्याण-सीए फाऊंडेशनच्या परिक्षेसाठी डोंबिवलीतील (Dombivli ) सुमारे २०० विद्यार्थ्यांचे केंद्र कल्याणमधील मुथा काँलेज (Mutha College) , अग्रवाल काँलेज, युनिक काँलेजमध्ये आले असून या परिक्षेला जाण्या येण्यासाठी विद्यार्थींसाठी शिवसेनेच्या युवा सेनेतर्फे बससेवा (Bus Service) मोफत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

युवासेनेचे जिल्हाधिकारी दिपेश म्हात्रे यांनी ही सेवा उपलब्ध केली आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार ही सेवा परीक्षार्थी विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे. डोंबिवलीतील बाजी प्रभू चौकातून १२ वाजता बस विद्यार्थींकरीता असेल. येत्या ८ ,१०, १२ आणि १४ डिसेंबर रोजी विद्यार्थी या बसने कल्याणला मोफत जाऊ शकतात. तसेच परीक्षा संपल्यावर ५ वाजता हीच बस विद्यार्थ्यांना परत डोंबिवलीत आणणार आहे. रेल्वे गाडय़ा सुरु नसल्याने विद्यार्थ्यांसाठी बसची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.