What a time it was for the cremating staff; MNS remained standing behind the employee

शुक्रवारी रात्री मेसेज पाठवून उद्यापासून कामावर न येण्याचे आदेश आल्या नंतर या कामगारांची पायाखालची वाळू सरकली. त्यामुळे कोरोनाच्या काळात न घाबरत मेहनत घेऊन काम करून आपले कुटूंब चालवणाऱ्या या गरीब लोकांवर एकप्रकारे संकट आले आहे. कामगारांना पुन्हा कामावर घ्या अन्यथा संघर्ष करू असा इशारा मनसेने दिला आहे.

ठाणे : कोरोनाच्या (corona) काळात आपला जीव धोक्यात घालून कोविड संसर्गाने मृत्युमुखी पडलेल्यांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आता बेकारीची कुऱ्हाड कोसळल्याने ठाण्यात संघर्षाला सुरुवात झाली आहे. ठाण्यातील जवाहरबाग स्मशानभूमीत मागील सहा महिन्यांपासून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकण्यात आले आहे. महाराष्ट्र नव निर्माण सेना(MNS) या कर्माचाऱ्यांच्या पाठीशी उभी राहिली आहे.

या स्मशानभूमीत ६० कंत्राटी कामगार नेमण्यात आले होते. स्वतःचा जीव धोक्यात घालून, तीन शिफ्टमध्ये हे कर्मचारी काम करत होते. या सर्वांनी आपले कर्तव्य चोख बजावले मात्र, आता कोरोनाचे रुग्ण वाढत असतांनाच त्यांना तडकाफडकी कामावरून काढण्याचे निंदनीय कृत्य येथील कंत्राटदाराने केले आहे.

शुक्रवारी रात्री मेसेज पाठवून उद्यापासून कामावर न येण्याचे आदेश आल्या नंतर या कामगारांची पायाखालची वाळू सरकली. त्यामुळे कोरोनाच्या काळात न घाबरत मेहनत घेऊन काम करून आपले कुटूंब चालवणाऱ्या या गरीब लोकांवर एकप्रकारे संकट आले आहे. कामगारांना पुन्हा कामावर घ्या अन्यथा संघर्ष करू असा इशारा मनसेने दिला आहे.

या कामगारांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे(ravindra more) यांची भेट घेत हा प्रकार त्यांना सांगीतला. या कर्मचाऱ्यांनी रवींद्र मोरे यांच्यासोबत जव्हारबाग स्मशानभूमीच्या दारांत ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली.

या दरम्यान आलेल्या मृतदेहांना आत घेतले जाणार नसल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले. स्मशानभूमीत काम करणाऱ्या या कामगारांना त्वरित रुजू करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा यावेळी मनसेने दिला.