What is Mahavikas Aghadi in Kalyan Dombivali Municipal Corporation election?

डोंबिवली : राष्ट्रवादीची भूमिका २७ गावांची वेगळी नगरपालिका व्हावी अशी भूमिका होती. पण, आता विषय बदलत आहेत त्याचा निर्णय वरिष्ठ नेतेमंडळी घेतील. मात्र, कल्याण डोंबिवली महानगर पालिका निवडणुकीत महाआघाडी होऊ शकेल असे वाटते असे मत राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित कल्याण जिल्हाध्यक्ष जगनाथ तथा आप्पा शिंदे यांनी कल्याण ग्रामीण येथे व्यक्त केले.

राष्ट्रवादी कल्याण ग्रामीण तर्फे मानपाडेश्वर मंदिर येथे नवनिर्वाचित राष्ट्रवादी कल्याण जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे आणि कार्याध्यक्ष डॉ. वंडार पाटील यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता त्यावेळी शिंदे बोलत होते.

यावेळी डॉ. वंडार पाटील, दत्ता वझे, गुलाब वझे, उज्वला भोसले, भगवान पाटील, सुरेश जोशी, सखाराम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

संघटना बांधण्याचे काम मला देण्यात आले आहे. गेली सहा वर्षे पक्षावर जी मरगळ आली आहे ती आता दूर नक्की होईल. प्रत्येक वार्डची लढण्याची क्षमता आम्हाला करायची आहे. शिवसेना, राष्ट्वादी, काँग्रेस पक्षांचे नेते आणि जिल्हासंघटक चांगला निर्णय घेतील. पालकमंत्र्यांना येथील विषयाची चांगली माहिती आहे. सर्वांना सोबत घेऊन २७ गावांचा प्रश्न निकालात काढू.

कल्याण डोंबिवलीतून राष्ट्रवादी पक्षाचे नगरसेवक मोठ्या संख्येने निवडून यायला पाहिजे अशा पद्धतीने काम करावे लागणार आहे. एक बुथ दहा कार्यकते अशी बांधणी केली जाईल. कल्याण ग्रामीणमध्ये राष्ट्रवादी पदाधिकारी,  कार्यकर्ते यांची संघर्ष समितीशी जवळीक असल्याने सरकारच्या २७ गावाबाबत घेलेलेल्या निर्णयाला विरोध आहे. २७ गावांबाबत धरसोड भूमिका विद्यमान सरकारची असल्याने निवडणुकीत काम कसे करायचे असा प्रश्न नवनिर्वाचित अध्यक्षाना विचारण्यात आला.

राष्ट्रवादीला योग्य वाटा दिला तरच काम करू असे सांगितल्याने कडोंमपा निवडणुकीत महाविकास आघाडीचे काय हा प्रश्न अनुत्तरीत आहे.