MLA Manda Mhatre

यश गाठण्यासाठी महिलांना प्रचंड संघर्ष करावा लागतो. मी पहिल्या वेळी निवडून आले तेव्हा मोदींची लाट होती म्हटलं गेलं. मी दुसऱ्यांदा देखील निवडून आले. आता तर मोदींची लाट नव्हती ना? ते माझं काम होतं, माझं कर्तृत्त्व होतं. पण महिलांनी केलेलं काम झाकून टाकायचं, त्यांच्या बातम्या येऊ द्यायच्या नाहीत असे अनेक प्रकार असल्याचे मंदा म्हात्रे म्हणाल्या.

    नवी मुंबई : नवी मुंबईतील भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी भाजपच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. एका जाहीर कार्यक्रमात मंदा म्हात्रे यांनी महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्यासमोरच आपली ही खंत बोलून दाखवली आहे.

    भाजपामध्ये महिलांचा सन्मान होत नसल्याचा गंभीर आरोप करत मंदा म्हात्रे यांनी केला आहे. स्वतःचं कर्तृत्त्व सिद्ध करून सुद्धा पक्षाकडून डावललं जातं, अशा शब्दात मंदा म्हात्रे यांनी आपल्या पक्षाला घरचा आहेर दिला आहे.

    यश गाठण्यासाठी महिलांना प्रचंड संघर्ष करावा लागतो. मी पहिल्या वेळी निवडून आले तेव्हा मोदींची लाट होती म्हटलं गेलं. मी दुसऱ्यांदा देखील निवडून आले. आता तर मोदींची लाट नव्हती ना? ते माझं काम होतं, माझं कर्तृत्त्व होतं. पण महिलांनी केलेलं काम झाकून टाकायचं, त्यांच्या बातम्या येऊ द्यायच्या नाहीत असे अनेक प्रकार असल्याचे मंदा म्हात्रे म्हणाल्या.

    आजही महिलांना राजकारणात काम करताना संघर्ष करावं लागत आहे. एखादी स्त्री चांगलं काम करायला लागली की पुरुष नेते पंख छाटायला सुरुवात करतात. आज ही महिलांची कामे झाकून टाकण्याचं काम केलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला. मला तिकीट दिली किंवा नाही दिली तरी मी लढणार असल्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

    read_also content=”मुंबईतील कोरोना घालविण्यासाठी BMC चा जबरदस्त प्लान; नागरिकांचा बॉडी मास इंडेक्स तपासला जाणार~https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/corporation-to-conduct-survey-of-non-communicable-diseases-in-mumbai-citizens-body-mass-index-will-be-checked-nrvk-171732/”]