Video Viral | रेल्वे रूळ ओलांडताना समोरून आली ट्रेन आणि पुढे घडला धक्कादायक प्रकार, VIDEO तुफान व्हायरल... | Navarashtra (नवराष्ट्र)
ट्रेंडिंग टॉपिक्स
ब्रैकिंग न्यूज़
ठाणे
Published: Jul 19, 2021 08:00 AM

Video Viralरेल्वे रूळ ओलांडताना समोरून आली ट्रेन आणि पुढे घडला धक्कादायक प्रकार, VIDEO तुफान व्हायरल…

Navarashtra Staff
Mayur Sawant
कंटेन्ट रायटर
रेल्वे रूळ ओलांडताना समोरून आली ट्रेन आणि पुढे घडला धक्कादायक प्रकार, VIDEO तुफान व्हायरल…

कल्याणच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वरून मुंबई वाराणसी एक्सप्रेस निघाली होती. इंजिनमधून लोको पायलट एस के प्रधान आणि त्यांचा सोबत असलेले असिस्टंट रवी शंकर हे वेग वाढविण्याच्या तयारीतच होते. मात्र त्यांना समोर काहीतरी हरकत झाल्याची माहिती मिळाली. आणि त्यांनी क्षणाचा ही विलंब न लावता इमर्जन्सी ब्रेक सीसिस्टिमचा वापर केला.

  कल्याण : कल्याण रेल्वे स्थानकात आज मोटरमनच्या सतर्कतेमुळे रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या एका वृद्ध इसमाला जीवनदान मिळाले आहे. एक वृद्ध व्यक्ती रेल्वे रूळ ओलांडून पलीकडल्या बाजूस जाण्याचा प्रयत्न करीत होती. याच दरम्यान हा अपघात झाला. मात्र वृद्धाचा जीव थोडक्यात बचावला.

  कल्याणच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वरून मुंबई वाराणसी एक्सप्रेस निघाली होती. इंजिनमधून लोको पायलट एस के प्रधान आणि त्यांचा सोबत असलेले असिस्टंट रवी शंकर हे वेग वाढविण्याच्या तयारीतच होते. मात्र त्यांना समोर काहीतरी हरकत झाल्याची माहिती मिळाली. आणि त्यांनी क्षणाचा ही विलंब न लावता इमर्जन्सी ब्रेक सीसिस्टिमचा वापर केला.

  काही सेकंदातच एक्स्प्रेस त्या वृद्ध व्यक्तीच्या जवळ जाऊन जागेवर उभी राहिली. मात्र ही वृद्ध व्यक्ती अगदी मधोमध असल्याने इंजिनच्या खाली सापडली. यानंतर मोटरमन आणि फलाटावरील काही लोक खाली उतरले आणि त्यांनी या वृध्द इसमाला सुखरूपपणे इंजिन खालून बाहेर काढले. आज दुपारी १ च्या दरम्यान ही घटना घडली.

  प्लॅटफॉर्मवरून उतरून रूळ ओलांडून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाणे हे नियमबाह्य आहे व त्याशिवाय जीवघेणे देखील आहे. अश्या पद्धतीने रूळ न ओलांडण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने पुन्हा एकदा प्रवाशांना केले आहे. उपलब्ध असलेल्या ब्रिजचा वापर करा असे सांगण्यात येते. त्याचबरोबर थोडक्यात बचावलेल्या वृद्ध इसमाला देखील याबाबत उपस्थित अधिकाऱ्यांकडून समज देण्यात आला. नशीब बलवत्तर म्हणून लोको पायलट ने वेळेवर अर्जंट ब्रेक दाबल्याने पुढील अनर्थ टळला.

  तुम्हाला या बातमी बद्दल काय वाटते ?, हे आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा…

  Comments
  Advertisement
  Advertisement
  दिनदर्शिका
  ३१ शनिवार
  शनिवार, जुलै ३१, २०२१

  चायनीज कॉड हा गट फक्त विरोधासाठी तयार करण्याचा चीनचा प्रयत्न असून तो तयार होण्याआधीच भारत व अमेरिकेने तो उधळून लावायला हवा, असे वाटते का?

  View Results

  Loading ... Loading ...
  Advertisement
  Advertisement
  OK

  We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use.   More Information.