Wide bridges under the Black River under water; 10 to 12 villages lost contact, disrupted public life

    कल्याण :  मुसळधार पावसामुळे कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागात असणारा काळू नदीवरील रूंदे पुल पाण्यात खाली गेला आहे. यामुळे १० ते १२ गावांचा संपर्क तुटला आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे.

    काळु नदीवरील रूंदे पुल १९९८ साली बांधण्यात आला असुन पुलाची साधरण लांबी १२८ मीटर, रूंदी साडेसात मीटर असुन लो लेव्हल (सब मार्शिबल) ब्रीज प्रकारात असल्याने नेहमीच पावसाळ्यात अतिवृष्टी त काळुनदीच्या पाण्याखाली पुल जात असल्याने येथील रूंदे, आंबिवली, फळेगांव, नडगाव उशीद,मढ, दानबाव, पळसोली, शेई, अंबरजे, काकडपाडा, कुंभारपाडा, गेरसे आदी १०ते १२ गावांचा शहराशी संपर्क तुटतो.

    पाण्या खाली गेलेल्या या पुलाची उंची कमी असल्याने व नवीन पुलाच्या कामाचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने पावसाळ्यात अतिवृष्टी मुळे रूंदे पुल पाण्याखाली जात असल्याने वासिंद खडवली टिटवाळा भागाशी संपर्क तुटल्याने ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले असून रूग्णांना, तसेच नोकरी व्यवसाय करणा-या अनेक नागरिकांना यांचा फटका बसत असुन यामुळे जनजीवन विस्कळीत झाले कल्याण तालुक्यातील रुंदे काळू नदीवरील दरवर्षी अतिवृष्टी मुळे पावसाळ्यात पाण्याखााली जात असल्याने जनजीवन विस्कळीत होते आता तरी प्रशासनाने गंभीर्याने लक्ष देत नवीन उंच पुल बांधवा अशी मागणी यानिमित्ताने नागरिक करीत आहेत.