बारवी धरण भरल्याने ४ दरवाजे उघडून पाण्याच्या विसर्गास सुरुवात

बारवी धरणाची पाणी पातळी ७२.६० मीटर आहे. ती पूर्ण काठोकाठ भरली आहे. त्यामुळे धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडले जाऊन पाण्याचा विसर्ग सुरु झाला. यंदा बारवी धरण पूर्ण भरण्यास १ महिन्याचा विलंब झाला आहे. तसेच धरण भरल्याने ठाण्यातील कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीराभाईंदर या मनपासह तालुक्यातील गावांच्या पाण्याची चिंता मिटली आहे.

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यात एमआयडीसीच्या मालकीच्या मालकीचे बारवी धरण रविवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास भरले आहे. बारवी धरण (Barvi Dam) भरल्याने स्वयंचलित ४ दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग होत आहे. (automatic gates were opened and water started flowing) यामुळे ठाणे जिल्हातील शहरांची गाव खेड्यांची पाणी कपातीची चिंता मिटली आहे.

बारवी धरणाची पाणी पातळी ७२.६० मीटर आहे. ती पूर्ण काठोकाठ भरली आहे. त्यामुळे धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडले जाऊन पाण्याचा विसर्ग सुरु झाला. यंदा बारवी धरण पूर्ण भरण्यास १ महिन्याचा विलंब झाला आहे. तसेच धरण भरल्याने ठाण्यातील कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीराभाईंदर या मनपासह तालुक्यातील गावांच्या पाण्याची चिंता मिटली आहे.

रविवारी धरण भरणार असून स्वयंचलित दरवाजे उघडणार असल्याचा अंदाज आला होता. त्यामुळे धरणाखालील व नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. याबाबत तलाठी, ग्राम सेवक आणि सरपंच यांच्या मार्फत सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता.