पालघर मध्ये एका तासाच्या आत पोलिसांना मिळाले वेगवेगळ्या घरात २ मृतदेह

पालघर : लॉकडाऊनच्या काळात पालघर मध्ये पोलिसांना रात्री एका तासाच्या आत विजू दांडेकर चाळ मध्ये आणि कमला पार्कच्या विजयनगर मध्ये एका महिलेचा आणि एका पुरुषाचा असे २ मृतदेह सापडले

 पालघर : लॉकडाऊनच्या काळात पालघर मध्ये पोलिसांना रात्री एका तासाच्या आत विजू दांडेकर चाळ मध्ये आणि कमला पार्कच्या विजयनगर मध्ये एका महिलेचा आणि एका पुरुषाचा असे २ मृतदेह सापडले आहेत.  

मिळालेल्या माहितीनुसार , मृत महिला ही विजू दांडेकर चाळ मध्ये एकटी राहत होती. चार दिवसांपासून  त्या महिलेनं घराचा दरवाजा उघडला नाही आणि जेव्हा आजूबाजूच्या लोकांना या तिथून दुर्गंध येवू लागला तेव्हा इथल्या काही लोकांनी याची माहिती पालघर पोलीसांना दिली. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून जेव्हा या महिलेच्या घराचा दरवाजा तोडून घरात पाहिलं तर या महिलेचा मृत्यू झालेला होता. 

या महिलेचा मृतदेह जसे पोलीस घेऊन गेले नाही की तेवढ्यात  शिवसेनेच्या नगरसेविका अनुजा तरे यांनी पोलीसांना फोन करून माहिती दिली की, कमला पार्कच्या विजयनगर बिल्डींग मध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीनं काल पासून आपल्या घराचा दरवाजा उघडलेला नाही. ही माहिती मिळताच पोलिसांनी जेव्हा घटनास्थळी पोहचून त्याच्या घराचा दरवाजा उघडून पाहिलं तर या व्यक्तीचा मृत्यू झालेला होता. ६० वर्षीय रुडाल्फ अलबर्ट मेंजन्स नावाचा हा व्यक्ती देखील घरात एकटा राहत होता. त्याच्या सोबत कोणी नाहीये. या दोन्ही जणांचा मृत्यू कसा झाला हे अजून स्पष्ट झालेलं नाहीये. आता पोलिसांच्या चौकशीतचं हे समजू शेकल की या दोन्ही जणांचा मृत्यू कसा झाला आहे ते.