woman journalist arrested

योगिता जोशीने(Yogita Joshi) कल्याण पश्चिमेतील आधारवाडी परिसरात एका हॉटेल व्यावसायिकाला ‘तुला हॉटेल चालवायचे असल्यास महिन्याला एक लाख रुपये द्यावे लागतील’ असे धमकावून हॉटेल व्यावसायिकाकडून खंडणी मागितली होती. या प्रकरणी योगिता जोशी हिला अटक(Arrest Of Yogita Joshi) करण्यात आली आहे.

    कल्याण : कल्याण(kalyan) पश्चिम येथे एका हॉटेल व्यावसायिकाकडून खंडणी(Extortion) मागणाऱ्या एका महिला पत्रकारास (woman Journalist Arrested)कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी अटक केली आहे. योगिता जोशी असे महिला पत्रकाराचे नाव आहे.

    योगिता जोशीने कल्याण पश्चिमेतील आधारवाडी परिसरात एका हॉटेल व्यावसायिकाला ‘तुला हॉटेल चालवायचे असल्यास महिन्याला एक लाख रुपये द्यावे लागतील’ असे धमकावून हॉटेल व्यावसायिकाकडून खंडणी मागितली होती. या प्रकरणी योगिता जोशी हिला अटक करण्यात आली आहे.