टोकावडे पोलिसांनी आरोपींची नावे वगळली – पीडित महिलेने केली चौकशीची मागणी

मुरबाड : मिल्हे दलित अत्याचार प्रकरणात संशयास्पद भूमिका असणाऱ्या टोकावडे पोलिसांनी पुन्हा एका मारहाणीच्या गुन्ह्यातील आरोपींची नावे वगळल्याची तक्रार फिर्यादी महिलेने केल्याने टोकावडे पोलिसांच्या

मुरबाड : मिल्हे दलित अत्याचार प्रकरणात संशयास्पद भूमिका असणाऱ्या टोकावडे पोलिसांनी पुन्हा एका मारहाणीच्या गुन्ह्यातील आरोपींची नावे वगळल्याची तक्रार फिर्यादी महिलेने केल्याने टोकावडे पोलिसांच्या कारभारावर शंका उपस्थित होत आहे. याबाबत पीडित महिलेने मुरबाड पोलीस उपविभागीय अधिकारी बसवराज शिवपूजे यांच्याकडे चौकशीची मागणी केली आहे.

याबाबत टोकावडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत गणेशपुर येथे राहणाऱ्या उषा वडवले यांनी डॉ.शिवपूजे यांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की,  त्यांना झालेल्या मारहाणी प्रकरणी त्यांनी टोकावडे पोलिसांत फिर्याद नोंदवण्याचा प्रयत्न केला. मात्र यातील गोपाळ वडवले, नारायण वडवले या मुख्य आरोपींची नावे पोलिसांनी वगळून फिर्यादीवर जबरदस्तीने सही घेतली. त्यांच्या नातेवाईकांनीही या आरोपींना पाठीशी का घालत आहेत, अशी विचारणा पोलिसांना केली असता आम्ही लिहू तीच नावे फिर्यादीत येतील असा दम त्यांना देण्यात आला.तसेच जास्त बोलला तर जमावबंदीचे उल्लंघन केले म्हणुन सर्वांना अटक करू अशी धमकी दिली. टोकावडे पोलिसांच्या कारभाराबाबत आधीच उलटसुलट चर्चा सुरू असताना पुन्हा मिल्हे प्रकरणाप्रमाणेच पोलिसांनी गणेशपुर प्रकरणातही आरोपींची पाठराखण केल्याचा आरोप होत असल्याने टोकावडे पोलीस ठाणे वादात सापडले आहे.