अंबाडीत महिलांच्या दारू खरेदीसाठी भल्यामोठया रांगा

भिवंडी: भिवंडी तालुक्यातील अंबाडी येथे एका वाईन शॉपबाहेर चक्क महिलांनी दारू खरेदीसाठी रांग लावली होती. दारू खरेदीसाठी भल्यामोठया रांगा लावल्याचे चित्र दिसून येत होते. मात्र रांगेत उभ्या

 भिवंडी:  भिवंडी तालुक्यातील अंबाडी येथे एका वाईन शॉपबाहेर चक्क महिलांनी दारू खरेदीसाठी रांग लावली होती. दारू खरेदीसाठी भल्यामोठया रांगा लावल्याचे चित्र दिसून येत होते. मात्र रांगेत उभ्या असलेल्या महिलांना दारू खरेदीसाठी लॉकडाऊनमध्ये तीनशे रुपये मिळत असल्याचे त्या महिलांनी सांगितले तर काही  महिलांनी नवऱ्यासाठी दारू खरेदी करत असल्याचे सांगितले. 

लॉकडाऊनमुळे देशासह राज्याच्या आर्थिक चक्राला ब्रेक लागला होता. त्यावर उपाय म्हणून राज्यातील तळीरामांचा घसा ओला करण्याचा पर्याय सरकारने स्विकारला. त्यामुळे तिसऱ्या लॉकडाऊनच्या घोषणेनंतर राज्यात ठिकठिकाणी वाईन शॉपचे सशर्त शटर उघडण्यात आले. दारू दुकाने सुरु होण्याच्या अगोदरच अनेक ठिकाणी तळीरामांनी दारू खरेदीसाठी रांगा लावल्याचे पहायला मिळाले. तर बहुतांश वाईन शॉपबाहेर सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचेही दिसून आले. त्यानंतर काही काळ पुन्हा बंदी घालण्यात आली. परंतु, राज्याला महसूलाची गरज असल्याने राज्य सरकारने काही अटी आणि शर्थीनुसार पुन्हा वाईन शॉप उघडण्यास परवानगी दिली आहे.त्यामुळे वाईन शॉप घेण्यासाठी लेडीज फर्स्ट या प्रथेप्रमाणे भिवंडी तालुक्यातील अंबाडी येथील एका वाईन शॉपबाहेर चक्क महिलांनी रांगेत उभे राहून दारू खरेदी केल्याचे चित्र या ठिकाणी पाहवयास मिळाले आहे.दारू खरेदीसाठी रांगेत उभ्या असलेल्या महिलांना दारू कोणासाठी खरेदी करता असे विचारले असता बहुतांश महिलांनी नवऱ्यासाठी दारू खरेदी करीत असल्याचे सांगितले. तर काही महिलांना तर तळीरामांनीच काही पैश्यांचे आमिष दाखूवन  दारू खरेदीच्या रांगेत उभे केल्याचे सांगण्यात आले आहे.